7th Pay Commission : पूर्वीपासून अस्तित्वात असलेली मात्र सातव्या वेतन आयोगाच्या अधिसूचनेत समावेश करावयाची राहून गेलेली पदांना सातव्या वेतन आयोगानुसार अनुज्ञेय वेतनसंरचना (Pay Level in Revised pay Matrix) लागू करण्यात आली आहे. याबाबतची अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे.
$ads={1}
सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनश्रेणी लागू
६ वा वेतन आयोग (6th Pay Commission) दि. ७ ऑक्टोबर २००९ नुसार लागू केलेल्या वेतन संरचनेत आता सुधारणा करण्यात आली असून, कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार (7th Pay Commission) सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यात आली आहे.
पूर्वीपासून अस्तित्वात असलेली मात्र सातव्या वेतन आयोगाच्या अधिसूचनेत समावेश करावयाची राहून गेलेली पदे पुढीलप्रमाणे
वरीष्ठ ग्रंथपाल सहाय्यक, तांत्रिक सहायक, ग्राऊंडस्मन मार्कर (क्रिडांगण आरेखक), कनिष्ठ लेखा लिपिक / लेखा लिपिक, लघुटंकलेखक, आरोग्य परिचर, प्रयोगशाळा मदतनीस, कार्यकारी अभियंता, जनसंपर्क अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, वसतिगृह अधीक्षक, सहाय्यक क्रीडा संचालक, वायरमन, रोखपाल, वरिष्ठ सहाय्यक, क्रीडा संचालक, ग्रंथालय लिपिक, ग्रंथालय परिचर, डोमेस्टिक सर्वंट, शिपाई, प्रयोगशाळा परिचर, ग्रंथालय परिचर, मेड सर्वट, शिपाई-हमाल, सुरक्षा रक्षक, डाटा एन्ट्री ऑपरेटर आदि इतर पदांना आता 7 व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यात आली आहे.
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ च्या कलम ८ (३) येथील तरतुदी नुसार प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून शासन अधिसूचना दि.८ डिसेंबर २०२० अन्वये महाराष्ट्र अकृषि विद्यापीठे प्रमाणसंहिता (शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सुधारित वेतन) नियम, २०२० निर्गमित करण्यात आले आहेत.
सदर नियमासोबतच्या अनुसूचीमध्ये दिनांक २२ डिसेंबर २०२३ रोजीच्या शासन निर्णयामध्ये जोडलेल्या परिशिष्ट -अ येथील संवर्गाचा समावेश करण्यात आल आहे. सदर अधिसूचना वित्त विभागाचा अनौपचारिक संदर्भ दि.१७ जुलै २०२३ अन्वये प्राप्त मान्यतेनुसार निर्गमित करण्यात आला आहे. (शासन निर्णय)
सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचे हप्ते मंजूर
समग्र शिक्षा योजनेतून पगार होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय!
$ads={2}