Cleaning Staff News : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून संपूर्ण स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेत अधिकाऱ्यांबरोबरच स्वच्छता कर्मचाऱ्यांचा (Cleaner Worker) मोलाचा वाटा असून ते या मोहिमेचे खरे हिरो आहेत, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी त्यांचे कौतुक केले.
$ads={1}
सफाई कर्मचारी हे खरे हिरो ! महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना मिळणार या सुविधा
स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या वसाहती स्वच्छ करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, त्यांच्या इतर अडचणी देखील दूर करण्यात येतील, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना देखील आरोग्य विमा सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. रुग्णालयांमध्ये आगामी काळात Zero Prescription च्या माध्यमातून मोफत औषधे उपलब्ध करून दिली जातील असेही यावेळी बोलताना सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले, मुंबई स्वच्छ, सुंदर, निरोगी आणि प्रदूषण मुक्त करण्यात येत आहे. स्वच्छता हा विषय नागरिकांच्या आरोग्याशी निगडीत असल्याने स्वच्छतेला प्राधान्य दिले जात आहे.
नायगाव येथील बीडीडी चाळ परिसरातील नायगाव नवरात्रौत्सव मंडळाच्या भवानी माता मंदिराला मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी भेट दिली. यावेळी नागरिकांशी संवाद साधताना ते म्हणाले, पोलिसांच्या निवासस्थानाबाबत तसेच बीडीडी चाळीसंदर्भात लवकरच बैठक घेण्यात येईल.
आरोग्य सेविकांच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात सरकारकडून खुलासा
स्वच्छता कर्मचारी हे मुंबईतील संपूर्ण स्वच्छता मोहीमेचे खरे हिरो आहेत. मुंबईतील हा उपक्रम लोकचळवळ बनली असून राज्यातील सर्व शहरांमध्ये टप्याटप्प्याने हा पॅटर्न राबविणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.#संपूर्णस्वच्छतामोहीम #DeepCleaningDrive #CleanMumbai pic.twitter.com/WGzmOXwzqD
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) December 24, 2023
तसेच अनेक वर्षे प्रलंबित असलेले प्रकल्प शासनाच्या वतीने पूर्ण करण्यात येतील. मुंबई बाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत आणू, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.