Gram Panchayat Employees : राज्यातील धुळे महानगरपालिका क्षेत्रात ४० ग्रामपंचायत आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या आस्थापनेवर कायमस्वरूपी सामावून घेण्याबाबत मा. सदस्य श्री. कुणाल पाटील (धुळे ग्रामीण) यांनी नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात अतारांकित प्रश्न उपस्थित केला होता.
$ads={1}
राज्यातील या ग्रामपंचायत आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सामावून घेण्याबाबत - अतारांकित प्रश्न
धुळे महानगरपालिका क्षेत्रात समावेशित हद्दवाढ झालेल्या दहा गावांतील ४० ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या आस्थापनेवर कायमस्वरूपी सामावून घ्यावे, अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी शासनाकडे केली असल्याचे माहे एप्रिल, २०२३ मध्ये वा त्यादरम्यान केली असल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय?
असल्यास, सदर मागणी लक्षात घेता उर्वरित ४० ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे. असा अतारांकित प्रश्न मा. सदस्य श्री. कुणाल पाटील (धुळे ग्रामीण) यांनी उपस्थित केला होता, यावर सरकारने पुढीलप्रमाणे खुलासा केला आहे.
खुलासा : नगरविकास विभाग व ग्रामविकास विभाग व जलसंधारण विभाग महाराष्ट्र शासन मुंबई यांचेकडील दि. ५ जानेवारी २०१८ च्या अधिसूचनेनुसार धुळे शहरातील हद्दवाढ करण्यात आली असून त्यात ११ गावांचा समावेश करणेत आलेला आहे.
दि.१० ऑगस्ट २०१५ च्या प्रथम उद्- घोषणने नंतर नियुक्त झालेल्या ग्रामपंचायतील ४० कर्मचाऱ्यांच्या मूळ नियुक्त्या अनियमित व बेकायदेशीर असल्याचे निदर्शनास आल्याने त्तका. आयुक्त यांनी संबंधीत कर्मचाऱ्यांना दि. ७ सप्टेंबर २०१८ पासून तोंडी आदेशाने सेवेतून कमी करण्याबाबत मान्यता दिलेली आहे. त्यानुसार संबंधीत कर्मचाऱ्यांना सेवेतून तोंडी आदेशाने कमी करण्यात आलेले असून सद्यस्थितीत सदर कर्मचारी सेवेत नाहीत. असा खुलासा सन्माननीय मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी अतारांकित प्रश्नावर केला आहे. (अतारांकित प्रश्न)