Pariksha Pe Charcha 2024 Registration : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्यासोबतचा सातवा संवादात्मक कार्यक्रम 'परीक्षा पे चर्चा' (Pariksha Pe Charcha 2024) तालकटोरा स्टेडियम, नवी दिल्ली येथे जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. या कार्यक्रमात पालक, शिक्षक आणि विद्यार्थी सहभागी होऊ शकतात, नोंदणी (Registration) करून तुम्हाला प्रत्यक्ष कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. त्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे.
$ads={1}
परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात सहभागी होण्याची सुवर्णसंधी!
परीक्षा पे चर्चा (Pariksha Pe Charcha) हा कार्यक्रम गेल्या 6 वर्षांपासून शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्यावतीने आयोजित करण्यात येतो. त्यासाठी ऑनलाईन नोंदणी सुरु झालेली आहे.
मा. पंतप्रधान महोदय यांच्याशी संवाद साधण्यासाठी विचारायच्या 500 शब्दात प्रश्न विचारण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
विद्यार्थी, पालक व शिक्षक स्पर्धेत http://innovateindia.mygov.in/ppc-2024/ या वेबसाईटवरून सहभागी होण्यासाठी नाव नोंदवून स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. तसेच मा. पंतप्रधान महोदय यांना प्रश्न विचारू शकतात, त्यापैकी काही विद्यार्थी, शिक्षक व पालक यांची मा. पंतप्रधान यांना प्रत्यक्ष प्रश्न विचारण्यासाठी निवड होऊन संधी मिळू शकते.
MyGov वर स्पर्धांच्या माध्यमातून निवडलेले सुमारे 2050 विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना मा. संचालक, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली (NCERT) यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र तसेच PPC किट भेट देण्यात येणार आहे.
'परीक्षा पे चर्चा'मध्ये सहभागी होणाऱ्यांची नोंदणी करण्यासाठी आणि त्यांची निवड करण्यासाठी https://innovateindia.mygov.in/mr/ppc-2024 ऑनलाईन बहुपर्यायी प्रश्न (MCQ) स्पर्धा आयोजित केली जात आहे.
सहावी ते बारावी मध्ये शिकणाऱ्या मुलांसाठी, शिक्षक आणि पालकांसाठी सहभाग घेण्याकरीता ऑनलाईन लिंक उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. त्यासाठी दिनांक 12 जानेवारीपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई यांनी केले आहे.
परीक्षा पे चर्चा नोंदणी करण्यासाठी डायरेक्ट लिंक
खाली दिलेल्या (Pariksha Pe Charcha 2024 Registration) डायरेक्ट लिंकद्वारे 12 जानेवारी 2024 पर्यंत नोंदणी करता येईल. सहभागी विद्यार्थी, पालक व शिक्षक देखील प्रश्न विचारू शकतात. सर्व सहभागींना संचालक NCERT यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र (PPC 2024 Certificate) मिळणार आहे. सन 2024 करीता सहभाग नोंदविण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आलेली आहे.
परीक्षा पे चर्चा 2024 नोंदणी येथे करा - नोंदणी कशी करावी? व्हिडिओ पहा