महत्वाची अपडेट! सार्वजनिक आरोग्य विभाग भरती परीक्षेची उत्तरतालिका जाहीर - Sarvajanik Arogya Vibhag Bharti 2023 Answer Key

Sarvajanik Arogya Vibhag Bharti 2023 Answer Key : आरोग्य सेवा आयुक्तालय अंतर्गत गट-क व ड संवर्गातील परीक्षा - २०२३ राज्यातील २९ जिल्हयामध्ये १०८ परीक्षा केंद्रामध्ये दिनांक ३० नोव्हेंबर २०२३ ते ७ डिसेंबर २०२३ व दिनांक १२ डिसेंबर या तारखांना आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेची Answer Key आता उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

$ads={1}

सार्वजनिक आरोग्य विभाग भरती परीक्षेची उत्तरतालिका जाहीर

Sarvajanik Arogya Vibhag Bharti 2023 Answer Key

आरोग्य विभागातील गट 'क ' आणि ' ड' संवर्गातील एकूण १० हजार ९४९ रिक्त पदासाठी २९ ऑगस्ट २०२३ रोजी जाहिरात देण्यात आली होती. त्यानुसार दि. ३१ नोव्हेंबर, ७ डिसेंबर आणि १२ डिसेंबर रोजी राज्यातील २९ जिल्ह्यांतील १०८ परीक्षा केंद्रांमध्ये ३ सत्रात एकूण २ लाख ५७ हजार ३५० उमेदवारांनी ही ऑनलाईन परीक्षा दिली आहे.

आरोग्य विभाग भरती परीक्षा दिलेल्या उमेदवारांना आता १५ डिसेंबर २०२३ पासून उमेदवारांच्या लॉगिन आय.डी. वर त्या-त्या उमेदवाराने सोडवलेली उत्तर पत्रिका (Answer Sheet) व अपेक्षित असलेली उत्तर तालिका (Answer Key) उपलब्ध करुन देण्यात आली आहे. (लिंक खाली दिलेली आहे.)

यावर संबंधित उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या उत्तर तालिका (Answer Key) च्या अनुषंगाने चुकीचे प्रश्न, प्रश्नांचे चुकीचे पर्याय व चुकीच्या उत्तरास गुणदान वगैरे संबंधित आक्षेप / हरकत असल्यास सदर आक्षेप नोंदविण्यासाठी दि.१८ डिसेंबर २०२३ ते दि. २० डिसेंबर २०२३ या कालावधीत TCS कडून लिंक खुली करण्यात येणार आहे.

भारतीय नौदलात 10 वी पास, ITI आणि ‘या’ उमेदवारांना नोकरीची मोठी संधी!

सादर केलेल्या आक्षेप / हरकतीबाबत टि.सी. एस. चे प्रश्नोत्तर समितीकडून योग्य तो निर्णय घेण्यात येणार आहे. टीसीएस कंपनीकडून आक्षेप / हरकत सादर करणेसाठी प्रति आक्षेप / हरकती करीता रु.१००/- प्रमाणे फी आकारण्यात येते. आक्षेप / हरकत योग्य असल्यास सदरची फी परत करण्यात येते व आक्षेप अयोग्य असल्यास फी परत केले जाणार नाही.

आरोग्य विभाग भरती परीक्षा Answer Key येथे पहा

कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती, विधानपरिषदेत तारांकित प्रश्न
सोलापूर महानगरपालिकेमध्ये विविध पदासाठी मोठी भरती

$ads={2}

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा