SSB Coaching : मोठी संधी! भारतीय सैन्यदलात अधिकारी पदावर भरतीसाठी मोफत प्रशिक्षण; सविस्तर जाणून घ्या..

SSB Coaching : भारतीय दलातील सैन्यदल, नौदल आणि वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सेवा निवड मंडळ SSB या परीक्षेची पूर्व तयारी करून घेण्यासाठी उमेदवारांना सुवर्णसंधी आहे, भारतीय दलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व परीक्षेचे प्रशिक्षण २० नाव्हेंबर ते २९ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत नाशिक येथे सशस्त्र सैन्य छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात मोफत देण्यात येणार आहे.

$ads={1}

मोठी संधी! भारतीय सैन्यदलात अधिकारी पदावर भरतीसाठी मोफत प्रशिक्षण

SSB Coaching

भारतीय दलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व परीक्षेच्या प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी मुंबई शहर जिल्ह्यातील उमेदवारांनी ९ नोव्हेबर २०२३ रोजी मुंबईतील सैनिक कल्याण कार्यालयात उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक अधिकारी यांनी केले आहे.

सदरचे प्रशिक्षण २० नाव्हेंबर ते २९ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत नाशिक येथे सशस्त्र सैन्य छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात मोफत देण्यात येणार आहे.

या पूर्वतयारी प्रशिक्षणासाठी मुंबई शहरातील उमेदवारांनी प्रवेश पत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन अर्ज संपूर्ण माहितीसह सादर करावा. या परीक्षेत पात्र होण्यासाठी Combined Defense Services Examination अथवा National Defense Academy Examination उत्तीर्ण झालेली असावी.

मनरेगा अंतर्गत नोकरीची संधी! - पनवेल महानगरपालिका जाहिरात पहा - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून नवीन जाहिरात प्रसिद्ध

त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेला असावे. एनसीसी ‘सी’ सर्टिफिकेट ‘ए’ किंवा ‘बी’ ग्रेडमध्ये उत्तीर्ण झालेले असावेत. एनसीसी हेडक्वार्टरने एसएसबीसाठी शिफारस केलेली असावी. टेक्न‍िकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एसएसबी मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे, विद्यापीठ प्रवेश प्रणाली साठी एसएसबी कॉल लेटर असावे किंवा एसएसबीसाठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.

शिक्षक भरतीच्या प्रक्रियेतील नवीन अपडेट; उमेदवारांसाठी नवीन सूचना..

अधिक माहितीसाठी training.pctcnashik@gmail.com  व 0253 2451032 किंवा व्हॉट्सॲप क्रमांक 9156073306 या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आले आहे.

$ads={2}

महाराष्ट्रातील शिक्षक भरतीला अखेर सुरुवात! नवीन वेळापत्रक पहा
 उमेदवारांची गुणांकन पद्धतीने थेट निवड होणार, सविस्तर तपशील जाणून घ्या....

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 135 जागांसाठी नवीन भरती; थेट मुलाखती
या विभागात 2 हजारांहून अधिक पदांची भरती सुरु

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा