Contract Employees Salary : राज्यामध्ये शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरु असून, जोपर्यंत नियमित शिक्षक उपलब्ध होत नाही, तोवर राज्यातील सेवानिवृत्त शिक्षकांच्या सेवा या कंत्राटी पद्धतीने काही जिल्ह्यात घेण्यात आल्या आहेत, या शिक्षकांच्या मानधनाबाबत आता नवीन शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
$ads={1}
राज्यातील या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनाकरिता निधी मंजूर
राज्यामध्ये पवित्र प्रणालीमार्फत नियमित शिक्षक भरती मधून शिक्षक उपलब्ध होईपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये सेवानिवृत्त शिक्षक कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती करण्याबाबत शासनाकडून दिनांक ७ जुलै २०२३ रोजीच्या पत्रान्वये निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार या नियुक्त शिक्षकांचे मानधन मंजूर करण्यात आले आहे.
कंत्राटी कर्मचारी शासकीय सेवेत कायम; शासन आदेश जारी..
राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरुपात भरण्यात आलेल्या ७०० शिक्षकांच्या मानधनाकरिता ९००० रुपये प्रतिमाह याप्रमाणे ११ महिन्यांकरिता एकूण मानधन रक्कम निधी वितरीत करण्यात आला असून तसा शासन निर्णय ६ नोव्हेंबर २०२३ रोजी निर्गमित करण्यात आला आहे. (शासन आदेश)
केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेसाठी नोंदणी सुरु, 'या' स्टेप्स फॉलो करा