BARTI : डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, पुणे आणि टाटा कम्युनिटी इनिशिएटिव्ह ट्रस्ट (Tata STRIVE) यांच्या संयुक्त विद्यमाने कौशल्य विकास विभागामार्फत सन 2023 24 या वर्षात विविध अनिवासी प्रशिक्षण कार्यक्रम पुणे व पुणे (नऱ्हे), नाशिक, नागपूर, ठाणे, मुंबई, तळोजा इत्यादी ठिकाणी राबविण्यात येत आहे. यामध्ये राज्यातील 500 युवक-युवतींना मोफत प्रशिक्षणासह नोकरीची हमी, सोबतच शिष्यवृत्ती देखील मिळणार आहे.
राज्यातील युवक-युवतींसाठी सुवर्णसंधी; बार्टी कडून मोफत प्रशिक्षणासह नोकरीची हमी
प्रशिक्षणाचे इतर फायदे - इंग्रजी भाषेचे प्रशिक्षण, व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण, कंप्युटर व उद्योजकीय प्रशिक्षण, मोफत प्रशिक्षण साहित्य (पुस्तके, गणवेश, शैक्षणिक साहित्य, वही, पेन.इ.). 100% नोकरीसाठी सहाय्य.
- उपरोक्त कौशल्य प्रशिक्षण निःशुल्क आहे व त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.
- सदर प्रशिक्षण कार्यक्रम हा अनुसूचित जाती मधील 18 ते 35 वयोगटातील युवक-युवतीसाठी आहे.
- इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज खाली दिलेल्या QR किंवा Google Form द्वारे मुळ माहिती सोबत भरावा.
- प्राप्त अर्जामधुन निकषांच्या आधारे विद्यार्थ्यांची छाननी केली जाईल.
- प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना अंतिम प्रवेशासाठी इ-मेल आणि कॉल द्वारे संपर्क करण्यात येईल.
- अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षणादरम्यान बार्टी संस्थेतर्फे दरमहा 4,000 ते 6,000 शिष्यवृत्ती
- प्रशिक्षण सुरु झाल्या नंतर उमेदवारांना गैरहजर राहता येणार नाही आणि प्रशिक्षणानंतर नोकरी करणे बंधनकारक आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, पुणे व Tata STRIVE यांच्या मार्फत अनुसूचित जातींमधील 500 युवक-युवतींसाठी पुणे, नाशिक, नागपूर, ठाणे, मुंबई येथे मोफत प्रशिक्षणाची सुवर्णसंधी, बार्टीच्या कौशल्य विकास विभागाअंतर्गत अनुसूचित जातीमधील 500 युवक-युवतीसाठी हि मोफत प्रशिक्षणाची सुवर्णसंधी आहे.
हे ही वाचा - जिल्हा परिषद भरती परीक्षा मोठी अपडेट - तलाठी भरती महत्वाचे प्रसिद्धी पत्रक जाहीर
आवश्यक कागदपत्रे
- जातीचा दाखला (Caste Certificate)
- आधार कार्ड
- शैक्षणिक प्रमाणपत्र (मार्कशिट)
- शाळा/महाविद्यालय सोडल्याचा दाखला (TC/LC)
- पासपोर्ट साईट फोटो
- मेडिकल फिटनेस प्रमाणपत्र
- रेशन कार्ड
- राष्ट्रीयकृत बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत
नाव नोंदणी येथे करा
मुंबई हाय कोर्टात नवीन पदांची भरती
बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये नोकरीची संधी!
कंत्राटी कर्मचारी लेटेस्ट न्यूज