Police Bharti 2023 : पोलिस भरती पूर्व निवासी प्रशिक्षण योजना या योजनेतंर्गत सन २०२२-२३ या वर्षामध्ये प्रशिक्षण कार्यक्रम राबविणा-या संस्थाना अनुदान वितरीत करण्याबाबत महत्वाचा शासन निर्णय दिनांक १६ नोव्हेंबर २०२३ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.
$ads={1}
पोलिस भरती पूर्व निवासी प्रशिक्षण योजनेतंर्गत अनुदान वितरीत करण्याबाबत महत्वाचा शासन निर्णय
राज्यातील अल्पसंख्याक समुदायातील उमेदवारांचे पोलीस भरतीतील प्रमाणात वाढ व्हावी याकरीता राज्यातील प्रत्येक जिल्हयामध्ये शासन निर्णय दि.२७ जुलै, २००९ अन्वये पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण योजना राबविण्यात येत होती. सदर योजनेत सुधारणा करून शासन निर्णय दि. १७ डिसेबर, २०२१ अन्वये सदर योजना निवासी स्वरुपात राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सुधारित शासन निर्णयानुसार प्रशिक्षण संस्थाना देय अनुदान टप्पा पध्दतीनुसार प्रशिक्षणाच्या सुरुवातीस ५०%, प्रशिक्षण सुरु झाल्यानंतर दोन महिन्याने २५% व प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी पोलिस भरती प्रक्रियेत (लेखीपरीक्षा, शारिरीक चाचणी परिक्षा) भाग घेतल्याचा पुरावा सादर केल्यानंतर उर्वरित २५% या प्रमाणे अनुदान वितरीत करण्यात येते.
जिल्हा परिषद भरती परीक्षांचे जिल्हानिहाय हॉल तिकीट येथे करा डाउनलोड डायरेक्ट लिंक
कर्मचारी अपडेट्स - कंत्राटी कर्मचारी - सरकारी कर्मचारी
सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात सदर प्रशिक्षण कार्याक्रम राबविण्यात येत आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी, गोंदिया व नागपूर यांनी प्रशिक्षणाच्या सुरुवातीचे ५०% व प्रशिक्षण सुरु झाल्यापासून दोन महिन्यानंतरचे २५% असे एकूण ७५% अनुदान वितरीत करण्याकरीता प्रस्ताव सादर केला आहे. तर जिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांनी प्रशिक्षणाच्या सुरुवातीचे ५०% अनुदान वितरीत करण्याकरीता प्रस्ताव सादर केला आहे.
$ads={2}
महाराष्ट्र शासन सार्वजनिक सुट्ट्या 2024 - अधिसूचना PDF डाउनलोड करा
सदर प्रस्तावांची शासन निर्णय दि. १७ डिसेबर, २०२१ मधील विहित तदतूदीनुसार छाननी करून सन २०२३-२४ या वर्षात या योजनेकरीता अर्थसंकल्पित केलेल्या व उपलब्ध असलेल्या निधीमधून सदर अनुदान वितरीत करण्यास शासानाने मान्यता दिली आहे. (शासन निर्णय)
सोलापूर महानगरपालिकेत मोठी भरती सुरु, संपूर्ण तपशील पाहा
जिल्हा परिषद भरती परीक्षांचे जिल्हानिहाय हॉल तिकीट येथे करा डाउनलोड डायरेक्ट लिंक