Maharashtra Government DA Latest News : राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात तब्बल 4% टक्के वाढ करण्यात आली आहे, दिनांक 23 नोव्हेंबर 2023 रोजी काढलेल्या आदेशान्वये आता 1 जुलै 2023 पासून सदर महागाई भत्ता (DA Hike) लागू करण्यात आला आहे.
$ads={1}
मोठी बातमी! राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात भरघोस वाढ! शासन निर्णय जारी..
राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक १ जुलै, २०२३ पासून सुधारणा करण्याबाबतचा शासन निर्णय दिनांक २३ नोव्हेंबर २०२३ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.
दिनांक १ जुलै, २०२३ पासून ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर ४२% वरुन ४६% करण्यात आला आहे. तर ६ व्या वेतन आयोगानुसार (6th Pay Commission) असुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर २२१% वरुन २३०% करण्यात आला आहे.
निवृत्ती वेतनधारकांना मोठा दिलासा!राज्यातील या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढीचा निर्णय! अखेर नवीन शासन निर्णय जारी
५ व्या वेतन आयोगानुसार (5th Pay Commission) असुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर ४१२% वरुन ४२७% करण्यात आला आहे.
कर्मचारी अपडेट्स - कंत्राटी कर्मचारी महत्त्वाचे अपडेट - सरकारी कर्मचारी बातम्या - सरकारी नोकरीच्या संधी
सदर महागाई भत्ता वाढ दिनांक १ जुलै, २०२३ ते दिनांक ३१ ऑक्टोबर, २०२३ या कालावधीतील थकबाकीसह माहे नोव्हेंबर, २०२३ च्या वेतनासोबत रोखीने देण्यात येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय येथे पहा