Namo Divyang Shakti Abhiyan 2023 : दिव्यांगांना मोठा दिलासा! राज्यात 73 नवीन पुनर्वसन केंद्रे सुरू होणार

Namo Divyang Shakti Abhiyan 2023 : देशाचे मा. पंतप्रधान महोदय यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त विविध लोकोपयोगी उपक्रमांचा समावेश असलेला नमो ११ सूत्री कार्यक्रम शासनाने दिनांक ३ ऑक्टोबर, २०२३ च्या पत्रान्वये राज्यात राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 'नमो दिव्यांग शक्ती अभियान' अंतर्गत ७३ दिव्यांग पुनर्वसन केंद्रे सुरु करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.

$ads={1}

दिव्यांगांना मोठा दिलासा! राज्यात 73 नवीन पुनर्वसन केंद्रे सुरू होणार

Namo Divyang Shakti Abhiyan

केंद्र शासनाच्या SIPDA योजनेंतर्गत राज्यातील जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रामार्फत दिव्यांग व्यक्तींसाठी विविध सेवा-सुविधा, थेरपी, सर्वेक्षण, विविध योजनांसाठी समुपदेशन व मदत करणे, जनजागृती करणे, त्वरित निदान व शीघ्र हस्तक्षेप शिबिरांचे आयोजन करून सहाय्यक साधने पुरवणे, शासन व धर्मादाय संस्थांच्या मदतीने सर्जिकल विषयक सुविधा, विविध प्रशिक्षण इत्यादी सेवा-सुविधा पुरविण्यात येतात. 

जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आलेली आहे. जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रातील कर्मचाऱ्यांचे मानधन, कार्यालयीन खर्च व साधन-सुविधांचा खर्च इत्यादी बाबींसाठी केंद्र शासनाने निर्धारित केल्याप्रमाणे अनुदान देण्यात येते. या अंतर्गत सध्या २१ जिल्ह्यामध्ये जिल्हा पुनर्वसन केंद्रे सुरु आहेत.

महिला व बालकल्याण विभागाची महत्वाची बैठक संपन्न

त्याच धर्तीवर 'नमो दिव्यांग शक्ती अभियान' अंतर्गत राज्यातील दिव्यांग व्यक्तींना आवश्यक त्या सोयी-सुविधा व मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दोन याप्रमाणे ७२ आणि मुंबई शहर व मुंबई उपनगर साठी अतिरिक्त एक अशी एकूण ७३ दिव्यांग पुनर्वसन केंद्रे विशेष अभियानांतर्गत सुरू करण्यात येणार आहेत.

कर्मचारी अपडेट्स - कंत्राटी कर्मचारी महत्त्वाचे अपडेट - सरकारी कर्मचारी बातम्या - सरकारी नोकरीच्या संधी

Namo Divyang Shakti Abhiyan : सदर विशेष अभियानास 'नमो दिव्यांग शक्ती अभियान' असे संबोधण्यात येणार आहे. राज्यात दिव्यांग व्यक्तींना मूलभूत उपचार, आवश्यकतेनुसार शस्त्रक्रिया, उपकरणांची आणि सहायक उपकरणांची उपलब्धतेच्या माध्यमातून पुनर्वसनासाठी सहाय्य आणि सामाजिक सुरक्षितता देण्यासाठी दिव्यांग व्यक्तींशी निगडीत शासनाच्या सेवा प्रदान करण्यासाठी सदर अभियानातंर्गत दिव्यांग पुनर्वसन केंद्रामार्फत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रे वगळता या अभियानाकरिता निवड केलेल्या इतर संस्थांना खालीलप्रमाणे तज्ञ व कर्मचारी वर्ग नेमणे व उपलब्ध ठेवणे आवश्यक असणार आहे.

  1. Rehabilitation Psychologist
  2. Occupational Therapist / Physiotherapist
  3. Sr. Prosthetist/Orthotist
  4. Multi Purpose Rehabilitation Worker
  5. Attendance cum peon cum Messenger.

रुग्णालये, जिल्ह्यात काम करणाऱ्या पुनर्वसन व्यावसायिकांच्या सेवा आरोग्य विभाग अंतर्गत फिटमेंट सेंटर यांच्या सर्व शिक्षा अभियान विशेष शाळा पुनर्वसन अभ्यासक्रम चालवणाऱ्या संस्था आणि सेवा केंद्र स्वयंसेवी संस्था आणि इतर NGO संचलित योजना आणि केंद्रे शिबिरासाठी वापरली जाणार आहे.

तसेच दिव्यांग व्यक्तींना सर्व सुविधा देण्यासाठी त्या भागातील विशेष शाळा, विशेष शिक्षक, स्वयंसेवी संस्था, स्वयंसेवी कार्यकर्ता, अनाथ आश्रम, निवासी शाळा, वृद्धाश्रम व डे केअर सेंटर यांची मदत घेण्यात येणार आहे. (सविस्तर शासन निर्णय येथे पहा)

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा