Arogya Vibhag Hall Ticket 2023 : आरोग्य विभागाच्या गट 'क' व 'ड' भरतीसाठी संदर्भात महत्वाची अपडेट, आता या पदभरतीच्या परीक्षांचे वेळापत्रक नुकतेच जाहीर झाले असून, दिनांक 30 नोव्हेंबर 2023 ते 12 डिसेंबर 2023 या कालावधीत परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे, या परीक्षांचे आरोग्य विभाग हॉल तिकीट (Public Health Department Admit Card) उमेदवारांना जाहीर करण्यात आले आहे, सुधारित वेळापत्रक आणि हॉल तिकीट डाउनलोड डायरेक्ट लिंक या लेखामध्ये दिलेली आहे, तेथून तुम्ही Arogya Vibhag Hall Ticket डाउनलोड करू शकता.
$ads={1}
आरोग्य विभाग परीक्षांचे हॉल तिकीट व सुधारित वेळापत्रक येथे डाऊनलोड करा डायरेक्ट लिंक
सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत गट क व ड संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत दिनांक २९ ऑगस्ट २०२३ पासुन उमेदवरांची नोंदणी व ऑनलाईन अर्ज स्वीकृतीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली होती.
एकूण जागा : सदर जाहिरातीस अनुसरून 2 लाख 56 हजार 897 उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले असून, गट ‘क’ मधील एकूण 55 संवर्गातील 6 हजार 949 रिक्त पदे आहे. तर गट 'ड' संवर्गातील 4 हजार 10 रिक्त पदे आहेत.
परीक्षा दिनांक : त्यानुषंगाने ऑनलाईन परीक्षा दिनांक 30 नोव्हेंबर 2023 ते 7 डिसेंबर 2023 व दिनांक 12 डिसेंबर 2023 रोजी राज्यातील नेमुन दिलेल्या परीक्षा केंद्रावर आयोजित करण्यात आलेली आहे.
आरोग्य विभाग भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवांनी त्यांचे Admit Card (Arogya Vibhag Hall Ticket) आरोग्य विभागाच्या https://arogya.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर दिलेल्या लिंक (Link) वरून डाऊनलोड करून घ्यावेत. असे आरोग्य विभागाने कळविले आहे.
पवित्र पोर्टल शिक्षक भरती निवड यादी PDF येथे पहा
हे ही वाचा : महागाई भत्ता GR - कंत्राटी कर्मचारी - नोकरीच्या संधी - परीक्षांचे निकाल
आरोग्य विभाग हॉल तिकीट डाऊनलोड कसे करावे?
- सर्वप्रथम https://arogya.maharashtra.gov.in/ या आरोग्य विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. (किंवा खाली डायरेक्ट लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करा)
- तिथे 'APPLY HERE For Group D- Click Here for New Registration/Login' असे दिसेल त्यावर क्लिक करा.
- त्यानंतर नवीन पेज ओपन होईल त्यावर New Registration /Login असे दिसेल. तिथे Login वर क्लिक करा.
- आता तुमचा रजिस्ट्रेशन नंबर/ लॉगिन आयडी टाकून पासवर्ड टाका आणि Submit वर बटणावर क्लिक करा. आता तुम्हाला स्क्रीनवर हॉल तिकीट दिसेल ते डाऊनलोड करा आणि त्याची प्रिंट काढून घ्या.
$ads={2}
आरोग्य विभाग परीक्षांचे हॉल तिकीट येथे डाऊनलोड करा डायरेक्ट लिंक
सुधारित (आरोग्य विभाग भरती परीक्षा) वेळापत्रक येथे पहा
सरकारी नोकरी शोधताय? या विभागात विविध पदांसाठी भरती सुरु
राज्याच्या उत्पादन शुल्क विभागांतर्गत मेगाभरती