मोठी बातमी! पवित्र पोर्टल शिक्षक भरती निवड यादी जाहीर - Pavitra Portal Teacher Recruitment 2017 Merit List PDF

Pavitra Portal Teacher Recruitment : राज्यातील शिक्षक भरती संदर्भात महत्वाची अपडेट, स्थानिक स्वराज्य संस्थातील व मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांतील रिक्त जागांसाठी मुलाखतीशिवाय पदभरती या प्रकारांतर्गत (Maha Teacher Recruitment Result)  गुणवत्तेनुसार निवड यादी दिनांक 29 नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आलेली आहे, Pavitra Portal 2017 Merit List PDF या लेखामध्ये दिलेली आहे.  सविस्तर वाचा..

$ads={1}

मोठी बातमी! पवित्र पोर्टल शिक्षक भरती निवड यादी जाहीर

Pavitra Portal Teacher Recruitment

सन २०१९ मधील शिक्षक पदभरतीच्या वेळी अपात्र, गैरहजर, रुजू न होणे इत्यादी कारणांमुळे रिक्त राहिलेल्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून प्राधान्यक्रम घेण्यात आलेले होते. त्यानुसार आता पवित्र पोर्टल (Pavitra Portal) वर गुणवत्तेनुसार (Pavitra Portal 2017 Merit List) निवडीची यादी जाहीर करून शिफारस करण्यात आली आहे.

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०१७ नुसार पवित्र पोर्टलमार्फत यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थातील व मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या खाजगी शैक्षणिक संस्थांकरिता मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह पदभरतीचा पर्याय निवडलेल्या खाजगी शैक्षणिक संस्थातील मुलाखतीसह पद भरतीसाठीची कार्यवाही आता करण्यात आलेली आहे.

निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांच्या आवश्यक कागदपत्राची पडताळणी संबंधित व्यवस्थापनाची निवड समिती करेल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. असे कळविण्यात आले आहे.

शिक्षक भरती यादी जाहीर, असे चेक करा आपले स्टेट्स

  • सर्वप्रथम https://tait2017.mahateacherrecruitment.org.in/ या अधिकृत वेबसाईटवर जा.
  • त्यानंतर लॉगीन आयडी व पासवर्ड टाकून लॉगिन करा 
  • त्यानंतर उजव्या बाजूला तीन रेषा आहेत त्यावर क्लीक करा
  • आता Applicant Recommended status वर क्लीक करा
  • आता View Recommended Institute list मध्ये आपली निवडीसाठी शिफारस झाली असल्यास, सदर व्यवस्थापनाचे नाव व शिफारस झालेले पद दिसेल.
  • View Preferencewise status यावर क्लिक केल्यानंतर आपण लॉक केलेले प्राधान्यक्रम व त्यातील शिफारस झालेला प्राधान्यक्रम दिसेल. 
  • त्यानुसार आता शिफारस झालेल्या व्यवस्थापनाकडे पुढील कार्यवाहीसाठी संपर्क साधावा.

उमेदवाराच्या निवडीसाठी रिक्त पदांच्या जाहिरातीतील त्याच्या प्रवर्गाचे / खुल्या प्रवर्गाचे (समांतर आरक्षण) गुण व जाहिरातीच्या संबंधित गटातील विषयाचे गुण Cutoff गुणापेक्षा अधिक गुण आवश्यक आहेत.

मोठी बातमी! कंत्राटी कर्मचारी शासन सेवेत नियमित,नियुक्ती पत्रांचे वाटप

मूळ रिक्त पदांच्या यादीतील उमेदवारांच्या शिफारस यादीनंतर शिल्लक राहिलेल्या माजी सैनिक या समांतर आरक्षणातील रिक्त राहिलेल्या पदापैकी १० टक्के पदे माजी सैनिक या समांतर आरक्षणात ठेऊन उर्वरित पदे त्या त्या प्रवर्गाच्या प्युअरमध्ये (समांतर आरक्षणाव्यतिरिक्त) वर्ग करून पात्र उमेदवारांची निवडीसाठी शिफारस करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. उमेदवारांना काही अडचणी आल्यास edupavitra@gmail.com या email वर संपर्क साधता येणार आहे. (Pavitra Portal 2017 Merit List PDF)

शिक्षक भरती निवड यादी येथे PDF पहा
Maha Teacher Pavitra Portal 2017 - https://tait2017.mahateacherrecruitment.org.in/

राज्याच्या उत्पादन शुल्क विभागांतर्गत मेगाभरती
मोठी अपडेट! सार्वजनिक बांधकाम विभाग भरती परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

Previous Post Next Post