New Pink Riksha Scheme for Women : महिलांसाठी नवीन रोजगाराची संधी! राज्यात पिंक रिक्षा योजना सुरू होणार

New Pink Riksha Scheme for Women : राज्यातील महिलांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध व्हाव्यात त्याचबरोबर सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी राज्य शासनाने महिलांसाठी ‘पिंक रिक्षा’ (Pink Riksha) ही नवीन योजना सुरू करणार असल्याची माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी दिनांक 28 नोव्हेंबर रोजीच्या बैठकीत दिली.

$ads={1}

महिलांसाठी नवीन रोजगाराची संधी! राज्यात पिंक रिक्षा योजना सुरू होणार

New Pink Riksha Scheme for Women

या बैठकीत ‘पिंक रिक्षा’ ही योजना परिपूर्ण करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. यामध्ये लाभार्थ्यांची निवड, E -रिक्षाला प्राधान्य देणे, बँका निवड तसेच प्रशिक्षण या सर्व बाबी तपासून घेण्याबाबत सांगण्यात आले. राज्यातील काही महत्त्वाच्या शहरांमध्ये ही योजना सूरू करणार असून, प्रायोगिक तत्त्वावर मुंबई, नवी मुंबई, पनवेल, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर व ठाणे या शहरात पिंक रिक्षा ही योजना सुरू करण्याचा मानस असल्याचा यावेळी मा. मंत्री महोदय यांनी सांगितले.

महिलांना सॅनिटरी पॅड (sanitary pads) पुरविण्यासाठी शासनाच्या सर्व विभागांशी समन्वय साधून गरजू लाभार्थी निवडीचे निकष तपासून ही देखील योजना यशस्वीपणे राज्यात राबवावी. महिला व बालविकास विभागाने शाळा, महाविद्यालये, गरीब व गरजू लाभार्थी महिला निवड यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करून शेवटच्या घटकातील महिलांना सॅनिटरी नॅपकिन्स पुरविण्याबाबत चोखपणे योजना राबवावी, अशा सूचना मंत्री कु. तटकरे यांनी दिल्या.

राज्यातील या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढीचा निर्णय!
दिव्यांगांना मोठा दिलासा!

बालधोरणाची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे निर्देश

राज्यातील प्रत्येक बालकाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सर्वसमावेशक असे ‘बालधोरण’ (Child Policy) महिला व बालविकास विभाग तयार करीत आहे. जनतेच्या हरकती आणि सूचना मागविण्यासाठी विभागाने बालधोरणाची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी.

माहिती संकेस्थळावर प्रसिद्ध केल्यानंतर विभागाने यामध्ये जनतेकडून आलेल्या सूचना व हरकतींवरही तातडीने कार्यवाही करावी. तसेच बालकांचा आहार, सुरक्षितता, शिक्षण व आरोग्य, हक्क, ग्रामीण व शहरी भागातील बालके यांच्या प्रश्नांबाबत प्रत्येक समाज घटकातील बालके आणि सर्व संस्था यांची देखील मते विचारात घ्यावीत. या कामाला प्राधान्य द्यावे, अशा सूचना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिल्या.

PWD विभाग भरती परीक्षांचे वेळापत्रक जाहीर - या विभागात मोठी भरती सुरु -आरोग्य विभाग परीक्षांचे हॉल तिकीट व सुधारित वेळापत्रक येथे पहा

$ads={2}

महिला व बालविकास विभागाच्या योजनांचा आढावा घेण्यासाठी मा. मंत्री महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयामध्ये बैठकीचे दिनांक 28 नोव्हेंबर रोजी आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिला व बालविकास विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सरकारी कर्मचारी व निवृत्तिवेतनधारकांसाठी गुड न्यूज!
राज्यातील या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढीचा निर्णय!

Previous Post Next Post