Winter Session 2023 : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे ७ डिसेंबरपासून

Winter Session 2023 : महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनाची अखेर तारीख ठरली असून, दि. ७ डिसेंबर २०२३ पासून नागपूर येथे हिवाळी अधिवेशनास सुरुवात होणार आहे. 29 नोव्हेंबर रोजी विधानभवन मुंबई येथे विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक संपन्न झाली. यावेळी अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली.

$ads={1}

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे ७ डिसेंबरपासून

Winter Session 2023

राज्याचे हिवाळी अधिवेशन (Winter Session 2023) गुरुवार दिनांक ७ डिसेंबर २०२३ ते बुधवार दिनांक २० डिसेंबर २०२३ या कालावधीत पार पडणार आहे. अधिवेशनाचे एकूण १४ दिवस (सुट्ट्यासह) प्रत्यक्ष कामकाज १० दिवस, सुट्या (शनिवार व रविवार) ४ दिवस हिवाळी अधिवेशन असणार आहे.

राज्यातील या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढीचा निर्णय!
महिला व बालविकास महत्वपूर्ण बैठक संपन्न

विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील विधानसभा विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार, मंत्री, दोन्ही सभागृहाचे सदस्य, विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे संबंधित मान्यवर उपस्थित होते.

$ads={2}

सरकारी कर्मचारी व निवृत्तिवेतनधारकांसाठी गुड न्यूज!
राज्यातील या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढीचा निर्णय!

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा