Samagra Shiksha Recruitment 2023 : भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने समग्र शिक्षा अभियान प्रकल्पाच्या तांत्रिक सहाय्य गटासाठी (TSG-SSA) विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. यामध्ये विविध पदासाठी 2 लाखांपर्यंत पगार असणार आहे.
$ads={1}
समग्र शिक्षा अभियानांतर्गत भरती, मिळणार 2 लाखांपर्यंत पगार
विभाग - शिक्षण मंत्रालय, समग्र शिक्षा (केंद्र सरकार)
पदाचे नाव - प्रधान मुख्य सल्लागार, मुख्य सल्लागार, वरिष्ठ सल्लागार, सल्लागार
दरमहा वेतन
- प्रधान मुख्य सल्लागार - 1 लाख 50 हजार ते 2 लाख रुपये दरमहा
- मुख्य सल्लागार - 1 लाख 20 हजार ते 1 लाख 50 हजार रुपये दरमहा
- वरिष्ठ सल्लागार - 1 लाख ते 1 लाख 20 हजार रुपये दरमहा
- सल्लागार- 80 हजार ते 1 लाख रुपये दरमहा
अर्ज करण्याची पद्धत - ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख - 8 नोव्हेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 28 नोव्हेंबर 2023
Application Fee अर्ज फी - कोणतेही शुल्क नाही.
राज्याच्या उत्पादन शुल्क विभागांतर्गत मेगाभरती; तब्बल 717 जागांवर भरती
आवश्यक शैक्षणिक पात्रता
- केंद्र सरकारच्या समग्र शिक्षा अभियान योजने अंतर्गत उमेदवारांनी संबंधित क्षेत्रात किमान 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी धारण केलेली असणे आवश्यक आहे.
- तसेच, उमेदवाराला कामाचा अनुभवही आवश्यक आहे.
- याशिवाय, पोस्टनिहाय आवश्यक पात्रता असणे आवश्यक आहे.
- Ph.D., MPhil तसेच संशोधन पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी डायरेक्ट लिंक
या भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहीरात वाचूनच edcilindia.co.in/TCareers ला भेट देऊन नंतर ऑनलाईन अर्ज हे खाली दिलेल्या डायरेक्ट लिंक वर तुम्ही अर्ज करू शकतात. ही सर्व पदे कंत्राटी तत्वावर भरली जाणार आहेत.
$ads={2}