Mahatransco Bharti 2023 : कंत्राटी पद्धतीने 3 वर्षाच्या कालावधीसाठी नियुक्ती मिळणार, त्यांनतर नियमित पदावर सामावून घेण्याबाबतचा निर्णय होणार

Mahatransco Bharti 2023 : सध्या राज्यभरात बहुतांश विभागामध्ये करार/ कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येत आहे, त्यातच आता महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित या कंपनीमार्फत 1 हजार 903 जागा कंत्राटी पद्धतीने 3 वर्षासाठी भरण्यात येत आहे, मात्र त्यांनतर नियमित पदावर सामावून घेण्याबाबतचा निर्णय कंपनीकडून घेण्यात येईल, असे कळविण्यात आले आहे. सविस्तर जाणून घ्या..

$ads={1}

कंत्राटी पद्धतीने 3 वर्षाच्या कालावधीसाठी नियुक्ती मिळणार

Mahatransco Bharti 2023

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित या कंपनीच्या अंतर्गत एकूण ७ परिमंडल कार्यालये (अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर, कराड, पुणे, वाशी) व राज्य भार प्रेषण केंद्र, ऐरोली हे कार्यालय आहे.

त्यापैकी ७ परिमंडल कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात वेगवेगळी विभागीय कार्यालये आहेत. त्या त्या विभागीय कार्यालया अंतर्गत येणा-या वेतनगट- ४ मधील विभाग स्तरीय सेवाजेष्ठतेतील "विद्युत सहाय्यक (पारेषण)" (कंत्राटी) या पदाची रिक्तपदे एकत्रित करून अनुशेषाप्रमाणे सरळसेवा भरतीद्वारे ०३ वर्षाच्या कंत्राटी कालावधीसाठी भरण्याकरिता अर्हतापात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज ऑनलाईन पध्दतीने मागविण्यात आले आहेत.

नियमित पदावर सामावून घेण्याबाबतचा निर्णय होणार 

विद्युत सहाय्यक (पारेषण) Electrical Assistant या पदाचा ०३ वर्षाचा कंत्राटी कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण केल्यानंतर अनुशेष आणि रिक्त पदे यांचा विचार करून, कंपनीची गरज विचारात घेवून व कंपनीच्या नियमांच्या अधीन राहून सदर उमेदवारांना सहाय्यक तंत्रज्ञ (सामान्य) Assistant Technician (General) या नियमित पदावर सामावून घेण्याबाबतचा निर्णय कंपनी प्रशासन घेईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

Mahatransco Bharti 2023

मानधन

निवड झालेल्या उमेदवारांना प्रथम ३ वर्षाच्या कंत्राटी कालावधी करीता खालीलप्रमाणे एकत्रित मानधन देण्यात येईल.

 1. प्रथम वर्ष - एकत्रित मानधन रुपये १५०००/- दरमहा
 2. द्वितीय वर्ष - एकत्रित मानधन रुपये १६०००/- दरमहा
 3. तृतीय वर्ष - एकत्रित मानधन रुपये १७०००/- दरमहा

उपरोक्त मानधनातून भविष्य निर्वाह निधी, आयकर, व्यवसाय कर, मेडिक्लेम इ. वजावट नियमानुसार करण्यात येईल.

शैक्षणिक अहर्ता

विद्युत सहाय्यक (पारेषण) या पदाकरिता उमेदवाराने खालील प्रमाणे शैक्षणिक अर्हता धारण केलेली असावी.

mahatransco bharti 2023

वयोमर्यादा

 • दि.१०.१२.२०२३ रोजी उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे व कमाल वय ३८ वर्षे असावे. वयोमर्यादेकरीता माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (एस.एस.सी.) प्रमाणपत्रावर नोंदविलेली / दर्शविलेली जन्मतारीख ग्राहय धरण्यात येईल.
 • शासनाच्या नियमाप्रमाणे सर्व मागासवर्गीय, आर्थिक दृष्ट्या दुर्बल व अनाथ घटकांतील उमेदवारांना कमाल वयोमर्यादा ५ वर्षांनी शिथीलक्षम राहील.
 • माजी सैनिकांसाठी कमाल वयोमर्यादा ही त्यांचा सैनिकी सेवेचा कालावधी अधिक ०३ वर्षे इतका राहील.
 • प्राविण्य प्राप्त खेळाडूंसाठी कमाल वयोमर्यादा ४३ वर्षे इतकी राहील.
 • दिव्यांग उमेदवारांकरीता सर्वसाधारण कमाल वयोमर्यादा ४५ वर्ष इतकी राहील.
 • प्रकल्पग्रस्त उमेदवारांकरीता कमाल वयोमर्यादा सरसकट ४५ वर्ष राहील.
 • भूकंपग्रस्त उमेदवारांकरीता कमाल वयोमर्यादा सरसकट ४५ वर्ष इतकी राहील.
 • महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णय दि.०३.०३.२०२३ मधील तरतुदीनुसार विहित केलेल्या कमाल वयोमर्यादेत ०२ वर्षे इतकी शिथिलता देण्यात येत आहे.
 • महापारेषण कंपनीतील पात्र कर्मचाऱ्यांसाठी कमाल वयोमर्यादा ५७ वर्षे राहील.
 • तदर्थ म.रा.वि.मंडळ / महापारेषण कंपनीत यशस्वीरित्या विजतंत्री या व्यवसायातील शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण पुर्ण केलेल्या उमेदवारांकरीता त्यांच्या प्रशिक्षण कालावधी इतकी कमाल वयोमर्यादा शिथीलक्षम राहील.

भरती प्रक्रियेचा कार्यक्रम

 1. अर्जदारांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी कंपनीच्या संकेतस्थळाची उपलब्धता - दिनांक २०.११.२०२३ पासून दिनांक १०.१२.२०२३ पर्यंत
 2. ऑनलाईन परीक्षेची अंदाजीत तारीख - फेब्रुवारी/मार्च - २०२४
$ads={2}

मूळ जाहिरात येथे PDF पहा
ऑनलाईन अर्ज येथे करा
अधिकृत वेबसाईट - https://www.mahatransco.in/

Previous Post Next Post