District Court Bharti 2023 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची सर्वात मोठी संधी आली आहे, महाराष्ट्र राज्यातील जिल्हा न्यायालयाच्या (District Court Recruitment 2023 Maharashtra) आस्थापनेवरील लघुलेखक (ग्रेड-३), कनिष्ठ लिपिक, शिपाई (हमाल) पदांच्या तब्बल 5763 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून, या पदाची निवड यादी व प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
$ads={1}
जिल्हा न्यायालयात 5763 जागांसाठी मोठी भरती
जिल्हा न्यायालयातील रिक्त जागांचा तपशील खालीलप्रमाणे
१) लघुलेखक (ग्रेड-३) Stenographer (Grade-III) पदांच्या एकूण 714 जागा भरण्यात येणार आहे, यामध्ये निवड यादी करीता 568 जागा तर प्रतीक्षा यादी करीता 146 जागा आहे.
२) कनिष्ठ लिपिक (Junior Clerk) पदांच्या एकूण 3495 जागा भरण्यात येत आहे. यामध्ये निवड यादी करीता 2795 जागा तर प्रतीक्षा यादी करीता 700 जागा आहे.
३) शिपाई / हमाल (Peon) या पदांच्या एकूण 1584 जागा भरण्यात येत आहे. यामध्ये निवड यादी करीता 1266 जागा तर प्रतीक्षा यादी करीता 318 जागा आहेत. अशा तिन्ही पदाच्या मिळून एकूण 5763 जागा भरण्यात येत आहेत.
जिल्हा न्यायालय विविध पदांसाठी वेतनश्रेणी (पगार)
- लघुलेखक (श्रेणी-3) - वेतन स्तर एस-14: (38600-122800)
- कनिष्ठ लिपिक - वेतन स्तर एस-6: (19900-63200)
- शिपाई/हमाल - वेतन स्तर एस-1 (15000-47600
जिल्हानिहाय रिक्त जागांचा तपशील
सर्व पदांसाठी आवश्यक वयोमर्यादा
- सर्वसाधारण प्रवर्गाच्या बाबतीत वय 18 वर्षापेक्षा कमी आणि 38 वर्षापेक्षा जास्त नसावे.
- अनुसूचित जाती, अनुसुचित जमाती, इतर मागासवर्ग किया विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांच्या बाबतीत 43 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
- योग्य मार्गाने अर्ज करणाऱ्या राज्य केंद्र सरकारी कर्मचाऱ्याच्या बाबतीत कमाल वयोमर्यादा लागू असणार नाही.
ऑनलाईन अर्ज कोठे करावा?
महत्वाच्या तारखा
महत्वाच्या लिंक
मूळ जाहिरात PDF डाउनलोड करा - District Court PDF Advertisement 2023
ऑनलाईन अर्ज - डायरेक्ट लिंक
अधिकृत वेबसाईट - https://bombayhighcourt.nic.in/
या विभागात 345 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध, सविस्तर तपशील जाणून घ्या..