New Education Policy : राज्यातील या विद्यार्थ्यांना विद्यापीठात मोफत शिक्षण देण्याचा सरकारचा मोठा निर्णय!

New Education Policy : डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी मुंबई (Dr Homi Bhabha State University Mumbai) येथे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी संदर्भात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय बैठक झाली. या बैठकीत NEP च्या अंमलबजावणी तसेच विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची संपूर्ण शैक्षणिक फी भरण्याबाबतचा दिलासादायक निर्णय घेण्यात आला.

$ads={1}

राज्यातील या विद्यार्थ्यांना विद्यापीठात मोफत शिक्षण देण्याचा सरकारचा मोठा निर्णय!

New Education Policy

नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक त्या शैक्षणिक उपाययोजना करून नवीन शैक्षणिक धोरण (New Education Policy) अंमलबजावणीला अधिक गती द्यावी, असे सांगून विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयात  शिक्षण घेणाऱ्या तृयीयपंथी विद्यार्थ्यांची संपूर्ण शैक्षणिक फी विद्यापीठाने भरण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे  उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांना मोफत उच्च शिक्षण

विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयात  शिक्षण घेणाऱ्या तृयीयपंथी विद्यार्थ्यांची संपूर्ण शैक्षणिक फी (Education Fee)  विद्यापीठाने स्वनिधीतून भरावी आणि या विद्यार्थ्यांना मोफत उच्च शिक्षण उपलब्ध होईल यासाठी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन उच्च शिक्षण मंत्री श्री. पाटील यांनी या बैठकीत केले. या आवाहनाला प्रतिसाद देत  सर्व कुलगुरूंनी बहुमताने हा निर्णय मान्य केला. त्यामुळे यापुढे तृतीयपंथी विद्यार्थ्यांना विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयात मोफत उच्च शिक्षण घेता येणार आहे.

शैक्षणिक वेळापत्रक व गुणांकन कार्यपध्दतीचे अचूक नियोजन करण्याचे निर्देश

बैठकीत नॅक मूल्यांकन, आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रम, कौशल्याभिमुख अभ्यासक्रम, उद्योजकांचा सहभाग, क्लस्टर महाविद्यालये, मातृभाषेतून शिक्षण, सीबीसीएस पद्धती (CBCS Method) , एबीसी प्राध्यापक भरती, प्रशिक्षण, सायबर गुन्हे, शैक्षणिक वेळापत्रक व गुणांकन कार्यपध्दतीचे अचूक नियोजन करावे. अशा सूचनाही श्री. पाटील यांनी यावेळी केल्या.

नवमतदार नोंदणी मोहीम

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री.पाटील म्हणाले, अठरा वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येक नवमतदारांची नोंदणी व्हावी. यासाठी निवडणूक विभागाच्या वतीने  नवमतदार नोंदणी मोहीम विद्यापीठ आणि महाविद्यालयात राबविण्यात  यावी या मोहिमेत NSS नी पुढाकार घ्यावा त्यामुळे  महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची मतदार नोंदणी होईल. यासाठी राष्ट्रीय सेवा योजना (NSS) टीमने पुढाकार घ्यावा.

सुवर्णसंधी! 5000 हून अधिक जागांसाठी मोठी भरती, जिल्हानिहाय रिक्त जागांचा तपशील येथे पहा

विविध स्तरांवर उच्च व तंत्र शिक्षणापासून काही विद्यार्थी दूर राहतात आणि ते विद्यार्थी व्यवसाय, नोकरीत असतात अशा विद्यार्थ्यांच्या मनात परीक्षेची भिती असते, या विद्यार्थ्यांसाठी ऑडिओ-व्हिज्युअल, उद्योग क्षेत्र यांची मदत घेऊन प्रमाणपत्र कोर्स अभ्यासक्रमाची यादी तयार करता येईल का याचाही विचार विद्यापीठाने करावा.

तसेच नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीबाबत कालबद्धपद्धतीने नियोजन करून अंमलबजावणी करावी, विद्यार्थ्यांच्या हिताची विद्यापीठानी खबरदारी घ्यावी असेही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री.पाटील  यांनी नवीन शैक्षणिक धोरणातील महत्वाच्या विषयांवर लक्ष केंद्रीत करून विद्यापीठांवर शैक्षणिक धोरण राबविण्याची मोठी जबाबदारी असल्याचे यावेळी सांगितले.

$ads={2}

TET प्रमाणपत्राची अट शिथील होणार?, महत्वाचे परिपत्रक
महाराष्ट्र राज्य विद्युत विभागात मोठी भरती जाहिरात पहा

HDFC बँक देत आहे 75,000 रु शिष्यवृत्ती! त्वरित येथे करा अर्ज

महत्वाच्या अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा