Majhi Shala Sundar Shala Launch : शिक्षणाचा उद्देश फक्त मुलांना शिकविण्यापुरता मर्यादित नसून विद्यार्थ्यांना चांगला माणूस म्हणून घडविणे हा शिक्षणाचा मुख्य उद्देश असला पाहिजे. राज्यातील शाळांचे गुणवत्तेनुसार श्रेणीकरण करणे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले. शिक्षणास प्राधान्य देणाऱ्या या अभियानाबद्दल राज्यपालांनी शासनाचे अभिनंदन केले. 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' या अभियानाचा शुभारंभ राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दि 5 डिसेंबर रोजी करण्यात आला.
$ads={1}
'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' अभियानासह विविध उपक्रमांचा राजभवन येथे शुभारंभ
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या अभियानासोबतच दत्तक शाळा योजना, महावाचन उत्सव- महाराष्ट्रातील वाचन चळवळ, माझी शाळा माझी परसबाग, स्वच्छता मॉनिटर टप्पा – 2 या उपक्रमांचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
प्रत्येक गावांमध्ये आदर्श शाळा निर्माण झाली पाहिजे
जागतिक स्पर्धेत विद्यार्थ्यांनी टिकून राहण्यासाठी महाराष्ट्रातील शाळा या उत्तम दर्जाच्या करणार असून स्पर्धेत टिकून राहण्यासाठी गुणवत्तेला पर्याय नाही. प्रत्येक गावांमध्ये आदर्श शाळा आणि आदर्श शिक्षण प्रणाली राज्यात अवलंबणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, शालेय शिक्षण विभागामध्ये अनेक बदल केले आहेत. विद्यार्थी आज शासकीय शाळेमध्ये शिकतात. खाजगी शाळांच्या तुलनेत ते कुठे कमी पडता कामा नये. अशाच आदर्श शाळा निर्माण करण्यासाठी शिक्षण विभागाच्या अभिनव योजनांचे आज लोकार्पण करण्यात आले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देखील 'शिका, संघटित व्हा' व 'संघर्ष करा' हा संदेश देत शिक्षणाला प्राधान्य दिले. आजचा कार्यक्रम हीच बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली. या अभियानाला 'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा' असे नाव दिल्यामुळे माझी जबाबदारी वाढलेली असून या कामात मी स्वतः जातीने लक्ष देईन.
#थेटप्रसारण
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) December 5, 2023
‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ शुभारंभ कार्यक्रमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे..https://t.co/rg9Ufp1zqx
दहा हजार नवीन कामगारांना रोजगार
227 मुंबई महानगरपालिकेच्या शाळांना आज कौशल्य विकास मंत्रालयाद्वारे कौशल्य विकास सेंटरने जोडण्यात आले आहे आणि याची व्याप्ती आपण पुढे आणखी वाढवणार आहोत. गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असताना टाटा कंपनी कंपनीसोबत उत्तम प्रशिक्षणाद्वारे त्वरित नोकरी मिळण्यासाठी सहाय्यभूत ठरणारे इनोव्हेशन सेंटर स्किल डेव्हलपमेंट सेंटर आज तेथे तयार केले आहे.
टाटा कंपनी मार्फत तेथे दरवर्षी पाच हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अनेकांना प्लेसमेंट तसेच अनेकांना उद्योजकतेचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. गडचिरोलीत सुरजागड येथे नवीन कारखाना तयार करण्यात आला दहा हजार कामगारांना रोजगार मिळाला. लवकरच तिथे स्टील प्लांट उभारण्यात येणार आहे. ज्यातून दहा ते बारा हजार लोकांना नोकरीची संधी मिळणार असल्याचे मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी सांगितले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी शिक्षणालाही महत्त्व दिले आहे. प्रधानमंत्री यांचा 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमाचा उल्लेखही मुख्यमंत्र्यांनी केला विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असणारी परीक्षेची भीती घालवण्यासाठी पंतप्रधानांनी केलेल्या 'परीक्षा पे चर्चा' या उपक्रमाचे कौतुक मुख्यमंत्र्यांनी केले.
विद्यार्थ्यांना विद्यापीठात मोफत शिक्षण देण्याचा सरकारचा मोठा निर्णय!
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा संपूर्ण माहिती पहा$ads={2}
TET प्रमाणपत्राची अट शिथील होणार?, महत्वाचे परिपत्रक
महाराष्ट्र राज्य विद्युत विभागात मोठी भरती जाहिरात पहा
HDFC बँक देत आहे 75,000 रु शिष्यवृत्ती! त्वरित येथे करा अर्ज