HDFC Scholarship 2023 : एचडीएफसी बँक देत आहे 75,000 रुपयांची शिष्यवृत्ती! त्वरित येथे करा अर्ज

HDFC Bank Parivartan Ecs Scholarship 2023 : HDFC बँक परिवर्तनचा ECSS कार्यक्रम 2023-24 हा HDFC बँकेचा एक उपक्रम आहे. ज्याचा उद्देश समाजातील वंचित घटकांतील गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांना आधार देणे आहे. HDFC शिष्यवृत्ती इयत्ता 1 ली ते 12 वी पर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी तसेच जे विद्यार्थी डिप्लोमा, ITI, पॉलिटेक्निक, UG आणि PG (सामान्य आणि व्यावसायिक) अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे.

$ads={1}

एचडीएफसी बँक देत आहे 75,000 रुपयांची शिष्यवृत्ती! त्वरित येथे करा अर्ज

HDFC  Scholarship 2023

एचडीएफसी बँक ही भारतातील आघाडीची बँकिंग आणि वित्तीय सेवा प्रदाता आहे. HDFC Bank Parivartan's ECSS Programme 2023-24 साठी ही शिष्यवृत्ती त्याच्या प्रमुख कार्यक्रमाचा भाग म्हणून सुरु केली आहे. 

ECSS कार्यक्रमांतर्गत, जे विद्यार्थी वैयक्तिक/कौटुंबिक किंवा इतर कोणत्याही आर्थिक समस्यांमुळे शिक्षणाचा खर्च उचलू शकत नाहीत त्यामुळे त्यांना आपले शिक्षण सोडावे लागते. अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी रुपये 75,000 हजार पर्यंत आर्थिक मदत दिली जाते.

किती मिळणार शिष्यवृत्ती?

या शिष्यवृत्तीचा लाभ हा इयत्ता 1 ली ते 6 वी साठी15,000 रुपये, 7 वी ते 12 वी, डिप्लोमा, ITI, आणि पॉलिटेक्निक अभ्यासक्रमांसाठी 18,000 रुपये, सामान्य पदवी अभ्यासक्रमांसाठी 30,000 रुपये, व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांसाठी 50,000 रुपये, सामान्य पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी 35,000 रुपये, व्यावसायिक पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी 75,000 रुपये शिष्यवृत्ती दिली जाते.

आवश्यक पात्रता

सदरची शिष्यवृत्ती ही सध्या इयत्ता 1 ते 12 वी, डिप्लोमा, ITI, किंवा पॉलिटेक्निक अभ्यासक्रमांमध्ये खाजगी, सरकारी किंवा सरकारी अनुदानित शाळांमध्ये शिक्षण घेत असलेले विद्यार्थी यासाठी पात्र आहेत. तसेच अर्जदारांनी मागील पात्रता परीक्षा किमान ५५% गुणांसह उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक असून, त्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न रुपये 2.5 लाख पेक्षा कमी किंवा समान असणे आवश्यक आहे.

सुवर्णसंधी! जिल्हा न्यायालयात 5763 जागांसाठी मोठी भरती, जिल्हानिहाय तपशील येथे पहा

$ads={2}

ऑनलाईन अर्ज येथे करा

महत्वाची अपडेट! राज्यातील केंद्रप्रमुख भरतीला सुरुवात
मोठी बातमी! पवित्र पोर्टल शिक्षक भरती निवड यादी जाहीर

महत्वाच्या अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा