Excise Department Recruitment 2023 : महत्वाची अपडेट! उत्पादन शुल्क विभागाच्या मेगाभरतीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ; आता या तारखेपर्यंत करता येणार अर्ज

Excise Department Recruitment 2023 : राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये विविध पदांच्या तब्बल 717 रिक्त जागांसाठी मेगाभरती राबविण्यात येत आहे. या भरतीसाठी आता ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

$ads={1}

उत्पादन शुल्क विभागाच्या मेगाभरतीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

excise department recruitment 2023

उत्पादन शुल्क विभागातील लघुलेखक (निम्न श्रेणी) (Stenographer (Low Grade)) , लघुटंकलेखक (Stenographer), जवान (Constable) , जवान नि वाहनचालक आणि चपराशी  या पदांच्या एकूण 717 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. 

या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 17 नोव्हेंबर 2023 पासून सुरू झाली आहे. त्यासाठी 1 डिसेंबर 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख होती.

मात्र, उमेदवारांना अर्ज करताना अनेक तांत्रिक अडचणींमुळे अर्ज करता आले नाहीत. तसेच राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस व गारपिटीने विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना काही दिवस इंटरनेट सुविधा उपलब्ध नव्हती. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना या भरतीसाठी अर्ज करता आले नव्हते.

आता या तारखेपर्यंत करता येणार अर्ज

विद्यार्थ्यांकडून अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या या मागणीचा मंत्री शंभूराज देसाई यांनी संवेदनशीलतेने विचार करून विभागास तात्काळ मुदतवाढ देण्याचे आदेश दिले. याबाबत विभागाचे अपर मुख्य सचिव आणि आयुक्त यांना त्यांनी निर्देश दिल्यानंतर  विभागाकडून सोमवार, दिनांक 4 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज सादर करण्यास मुदतवाढ केल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

$ads={2}

मूळ जाहिरात, ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक येथे पहा

महत्त्वाचे - तसेच ज्या उमेदवारांनी दि. 30 मे 2023 रोजीच्या जाहिरातीस नुसार दि. 30 मे 2023 ते 9 जून 2023 या कालावधीत अर्ज भरून परीक्षा शुल्क अदा केले आहे, त्यांनाच त्यांच्या अर्जात दि. 6 डिसेंबर 2023 ते दि. 8 डिसेंबर पर्यंत या कालावधीत बदल करता येणार आहेत.

याबाबत मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, विविध कारणांमुळे विद्यार्थ्यांना अर्ज सादर करताना अडचणी आल्या. मात्र, एकही इच्छुक विद्यार्थी भरती प्रक्रियेपासून वंचित राहू नये, अशी आमची भूमिका आहे. त्यामुळेच आता 4 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

अर्ज प्रक्रियेत कोणतीही तांत्रिक अडचण येऊ नये, यादृष्टीने संबंधितांना सूचना दिल्या आहेत. तसेच ही भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यास आम्ही कटिबद्ध असून, आता मुदतवाढीचा लाभ घेऊन सर्व इच्छुक विद्यार्थ्यांनी या भरती प्रक्रियेत आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहनही यावेळी मंत्री शंभूराज देसाई यांनी यानिमित्ताने केले आहे.

महत्वाची अपडेट! राज्यातील केंद्रप्रमुख भरतीला सुरुवात
मोठी बातमी! पवित्र पोर्टल शिक्षक भरती निवड यादी जाहीर

महत्वाच्या अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा