Kendra Pramukh Bharti 2023 : राज्यातील शिक्षकांसाठी एक महत्वाची अपडेट, बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असलेली केंद्रप्रमुख भरतीला आता सुरुवात झाली आहे, केंद्रप्रमुख परीक्षा 2023 या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन करण्यात येणार असून, याबाबत नवीन प्रसिद्धी पत्रक जाहीर करण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी डायरेक्ट लिंक आर्टिकल मध्ये दिलेली आहे.
$ads={1}
महत्वाची अपडेट! राज्यातील केंद्रप्रमुख भरतीला सुरुवात, नवीन प्रसिद्धी पत्रक जाहीर
राज्यातील सर्व जिल्हा परिषद (Zilla Parishad) प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख (Kendra Pramukh) पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा 2023 या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन करण्यात येणार आहे.
केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा 2023 या परीक्षेचे आयोजन दिनांक 5 जून 2023 अधिसूचने अन्वये जून 2023 महिन्याच्या शेवटच्या आठवडयामध्ये घेण्याचे नियोजित होते. परंतु मा.उच्च न्यायालय, मुंबई, खंडपीठ औरंगाबाद व नागपूर या ठिकाणी विविध याचिका दाखल झाल्या होत्या. त्यामुळे शासनाच्या दि. 20 जून 2023 अन्वये मान्यता मिळाल्यानुसार मा. न्यायालयीन दाखल याचिका व प्रशासकीय कारणास्तव ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती.
त्यानुसार आता शासनाच्या दि. 27 सप्टेंबर, 2023 निर्णयान्वये या परीक्षेच्या अर्हतेबाबत सुधारणा करण्यात आली आहे. ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे.
इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन प्रणालीव्दारे www.mscepune.in या संकेतस्थळावर दि 1 डिसेंबर ते दि 8 डिसेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन आवेदनपत्र व शुल्क भरण्याची कार्यवाही करण्याबाबत कळविण्यात आले आहे.
यापूर्वी सर्व पात्रतेसह यशस्वीरीत्या ऑनलाईन पध्दतीने योग्य शुल्कासह आवेदनपत्र भरलेल्या उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता असणार नाही.
या परीक्षेचा दिनांक MSCE Pune संकेतस्थळावर कळविण्यात येईल. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन प्रणालीव्दारे आवेदनपत्र व शुल्क भरण्याची कार्यवाही करावी असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने पत्रकाद्वारे कळविले आहे.
तसेच मा.न्यायालयाच्या आदेशान्वये ज्या उमेदवारांनी ईमेलव्दारे माहिती पाठवून परीक्षा शुल्काचा भरणा केला आहे, अशा उमेदवारांचे पडताळणी केली जाणार आहे. त्यांच्या बँक खाते क्रमांकावर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत सदरील परीक्षा शुल्क यथावकाश परत करण्यात येणार आहे. त्यामुळे या उमेदवारांना पुन्हा ऑनलाईन आवेदनपत्र व शुल्क दिलेल्या मुदतीत भरणे आवश्यक असणार आहे, असे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद केंद्र पुणे डॉ.नंदकुमार बेडसे यांनी कळविले आहे.
केंद्रप्रमुख जाहिरात, पात्रता, निवड प्रक्रिया. जिल्हानिहाय जागांचा तपशील ऑनलाईन अर्ज येथे करा
$ads={2}
मोठी अपडेट! सार्वजनिक बांधकाम विभाग भरती परीक्षांचे वेळापत्रक जाहीर