Contract Employees Latest News : राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी व कर्मचारी समायोजन कृती समीती तर्फे आरोग्य विभागांतर्गत अभियानात कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचारी दि. 25 ऑक्टोबर 2023 पासून आपल्या रास्त व न्यायीक मागण्यासंदर्भात बेमुदत काम बंद आंदोलनात सहभागी झाले होते. आता यासंदर्भात नुकतीच मा. मंत्री महोदय यांचे सोबत दि. 29 नोव्हेंबर 2023 रोजी मा, महोदयांच्या निवास स्थानी महत्वाची बैठक संपन्न झाली आहे.
$ads={1}
राज्यातील या कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची अपडेट!
राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission) कंत्राटी अधिकारी व कर्मचारी (Contract Employees) यांनी दि. 31 ऑक्टोबर 2023 रोजी आझाद मैदान, मुंबई येथे आंदोलन केले होते, यावेळी मा. मंत्री, सार्वजनीक आरोग्य विभाग डॉ. तानाजी सावंत साहेब, यांनी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 10 वर्षे सेवा झालेले अधिकारी व कर्मचारी यांचे 30% थेट सेवा समावेजन व 70% सरळसेवा भरती प्रक्रीया राबवून तसेच मंत्रीमंडळ बैठकीत धोरणात्मक निर्णय घेण्लयात येईल असे आश्वासित केले आहे. त्यानुसार दिनांक 8 नोव्हेंबर 2023 रोजीच्या पत्रान्वये शासनाने मान्यता दिली आहे. व पुढील कार्यवाही करण्यासाठी महत्वाचे निर्देश देण्यात आले आहे.
दिनांक 31 ऑक्टोबर 2023 रोजी कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांच्या विविध मागण्यांच्या पत्राच्या अनुषंगाने मा.मंत्री महोदय यांचे सोबत दि. 29 नोव्हेंबर 2023 रोजी मा, महोदयांच्या निवास स्थानी झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली आहे.
कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याबाबत - विधानसभा अतारांकित प्रश्न
आता राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचारी समायोजन कृती समिती, महाराष्ट्र राज्य यांनी मा.मंत्री महोदय यांचे सोबत दि. 29 नोव्हेंबर 2023 रोजी झालेल्या चर्चेनुसार बेमुदत काम बंद आंदोलनामध्ये सहभागी कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कुठलीही प्रशासकीय कारवाई करण्यात येऊ नये, संप काळातील कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन कपात करण्यात येऊ नये तसेच यांचा सेवाखंड ग्राहय धरण्यात येऊ नये असे मा. मंत्री महोदयांनी मान्य केलेले असून, त्याप्रमाणे संघटनेला स्वतंत्र पत्र देण्यात यावे. तसेच संपकारी कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावे अशी विनंती केलेली आहे, त्यानुसार आता सर्व सकारात्मक आश्वासनांवर सुरु असलेला संप तूर्तास स्थगीत करत असल्याचे कळविण्यात आले आहे. (विनंती पत्र)
कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करण्याचा प्रस्ताव शासनास सादर
मोठी बातमी! कंत्राटी कर्मचारी शासन सेवेत नियमित,नियुक्ती पत्रांचे वाटप
$ads={2}
पवित्र पोर्टल शिक्षक भरती निवड यादी जाहीर, PDF पहा
महिलांसाठी सरकारचा मोठा निर्णय येथे पहा