राज्य शासनाने दि. १ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा त्यानंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना (Defined Contribution Pension Scheme) तसेच राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली (National Pension Scheme) लागू करण्यात आली आहे. याबाबत आता महत्वाचे शासन परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
$ads={1}
राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीची अंमलबजावणी करण्याकरिताची कालमर्यादा निश्चित
राज्य शासनाने दि. १ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा त्यानंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी DCPS आणि NPS लाभ केंद्र शासनाच्या धर्तीवर राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीत (National Pension Scheme) समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, दि. १ एप्रिल २०१५ पासून सदर राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली (National Pension System) राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आली आहे. त्यानुसार दिनांक 6 एप्रिल 2015 च्या शासन निर्णयान्वये राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीतील स्तर-१ ची राज्यांतर्गत अंमलबजावणी करण्यासाठी कार्यपध्दती विहित करण्यात आली आहे.
राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली स्विकारुन 8 वर्षांपेक्षा जास्त कालावधी
महाराष्ट्र शासनाने राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली स्विकारुन 8 वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालेला आहे व राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीच्या अंमलबजावणीमध्ये प्रत्येक टप्प्यावर (उदा. नोंदणीकरण / मासिक अंशदाने वेळेत जमा करणे / अंशत: रक्कमा काढणे / राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीमधून बाहेर पडणे इत्यादीसाठी) होणारा विलंब लक्षात घेता, मा. महालेखापाल यांच्या लेखापरिक्षणाच्या अहवाल 13, वर्ष 2020 मध्ये त्याचबरोबर राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीच्या अंमलबजावणीमधील त्रुटी दूर करण्याच्या अनुषंगाने निवृत्तिवेतन निधी विनियामक व विकास प्राधिकरण (PFRDA) यांच्यासमवेत झालेल्या कार्यात्मक आढावा बैठकीमध्ये निदर्शनास आला आहे.
सद्य:स्थितीत राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी निवृत्तिवेतन निधी विनियामक व विकास प्राधिकरण (PFRDA) यांचेकडील कार्यपध्दतीस अनुसरुन विविध स्वरुपाच्या नवीन कार्यपध्दती राज्यस्तरावर स्विकारण्यात आल्या असून, सदर कार्यपध्दतीतील कालमर्यादेमध्ये बदल करणे आवश्यक आहे.
तसेच प्रतिनियुक्तीवरील अधिकारी/कर्मचारी यांच्याबाबत प्रान जनरेशन, मासिक अंशदाने जमा करणे, अंशतः रकमा काढणे, राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीमधून बाहेर पडणे इ. अंमलबजावणीमध्ये विलंब होत असल्याचे शासनाचे निदर्शनास आले असून, राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा कोषागार अधिकारी, आहरण व संवितरण अधिकारी, शासकीय कर्मचारी यांच्या स्तरावर पार पाडावयाच्या विहीत कार्यवाहीच्या कालमर्यादेमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
शिक्षक भरती: TET प्रमाणपत्राची अट शिथील होणार?, महत्वाचे परिपत्रक
राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कार्यवाहीच्या प्रत्येक टप्यावर पार पाडावयाची कालमर्यादा दिनांक 4 डिसेंबर 2023 च्या शासन परिपत्रकामध्ये विस्तृत करण्यात आले आहे.
$ads={2}
आरोग्य विभागातील या अस्थायी पदांना मुदतवाढ