Teacher Recruitment 2023 : शिक्षकांच्या नियुक्तीसाठी TET प्रमाणपत्राची अट शिथील होणार?, महत्वाचे परिपत्रक

Teacher Recruitment 2023 : राज्यामध्ये बऱ्याच दिवसापासून शिक्षक भरतीची प्रक्रिया राबविण्यात येत असून, शिक्षक भरतीसाठी राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या मार्गदर्शक तत्वानुसार शिक्षक पात्रता परीक्षा (TET) अनिवार्य आहे, मात्र TET संदर्भात मा. उच्च न्यायालय, खडपीठ मुंबई येथे याचिका दाखल करण्यात आली होती. आता याबाबत महत्वपूर्ण निकाल संबंधित शिक्षकांच्या बाजूने लागल्यामुळे सहायक शिक्षकांच्या नियुक्तीसाठी लागणारे TET प्रमाणपत्राची अट शिथील करण्याबाबत विनंती करण्यात आली आहे.

$ads={1}

शिक्षकांच्या नियुक्तीसाठी TET प्रमाणपत्राची अट शिथील होणार?, महत्वाचे परिपत्रक

teacher-recruitment-2023-tet-exam-update

श्रीमती सरफ शमशुद्दीन मसूद, व श्रीमती अन्सारी यास्मीन नसीम अहमद या उपशिक्षिकेने मा. उच्च न्यायालय, खडपीठ मुंबई येथे याचिका दाखल केली होती. सदर याचिकेच्या अनुषंगाने सदर शिक्षकांच्या बाजुने मा. उच्च न्यायालय, यांनी निकाल दिलेला असून, सदर निकालामध्ये अल्पसंख्याक संस्थेतील नियुक्त शिक्षकांना TET लागू होत नसल्याची बाब नमूद केलेली आहे. त्यामुळे राज्यातील अल्पसंख्याक संरचेतील सहायक शिक्षकांच्या नियुक्तीसाठी लागणारे TET प्रमाणपत्राची अट शिथील करुन शासन निर्णय निर्गमित करण्याची विनंती केली आहे.

राज्यातील अल्पसंख्याक संस्थेतील सहायक शिक्षकांच्या नियुक्तीसाठी लागणारे टीईटी (TET) प्रमाणपत्रासंदर्भात मा. उच्च न्यायालय, खंडपीठ मुंबई यांनी दिलेले आदेश विचारात घेता त्या संदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्याची कार्यवाही शालेय शिक्षण विभागाकडून तातडीने करणे आवश्यक आहे. 

उक्त नमूद बाब अल्पसंख्याक संस्थेशी निगडीत असल्याने सदर प्रकरणाची अल्पसंख्याक आयोगास दखल घेणे क्रमप्राप्त ठरल्याने उक्त नमूद प्रकरणी कार्यवाही करुन आपला स्वंयस्पष्ट अहवाल आयोगास पंधरा दिवसात सादर करण्याबाबत संबंधितांना निर्देश देण्यात यावेत. असे महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाकडून महत्वाचे परिपत्रक काढण्यात आले आहे.

HDFC बँक देत आहे 75,000 रु शिष्यवृत्ती! त्वरित येथे करा अर्ज

shikshak bharti tet exam update

$ads={2}

आरोग्य विभागातील या अस्थायी पदांना मुदतवाढ
सुवर्णसंधी! जिल्हा न्यायालयात 5763 जागांसाठी मोठी भरती, जिल्हानिहाय तपशील येथे पहा

महत्वाच्या अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Previous Post Next Post