School Exam 2024 : पालकांनो लक्ष द्या! शालेय विद्यार्थ्यांना आता वार्षिक परीक्षा पास होणे आवश्यक; शिक्षण विभागाचा महत्वपूर्ण निर्णय

School Exam 2024 : केंद्र सरकारने बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ (Right to Education Act 2009) मधील कलम १६ मध्ये सुधारणा केलेली आहे. त्यानुसार आता इयत्ता ५ वी व ८ वी वर्गासाठी वार्षिक परीक्षा अनिवार्य केलेली आहे.

शालेय विद्यार्थ्यांना आता वार्षिक परीक्षा पास होणे आवश्यक; शिक्षण विभागाचा महत्वपूर्ण निर्णय

School Exam 2024

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ (Right to Education Act 2009) दिनांक १ एप्रिल २०१० पासून संपूर्ण देशात लागू करण्यात आलेला आहे. प्रस्तुत कायद्यातील कलम-१६ मध्ये, कोणत्याही बालकास त्याचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत एकाच वर्गात ठेवता येणार नाही अथवा बालकास शाळेतून काढून टाकता येणार नाही असे नमूद केलेले आहे.

जर बालक वार्षिक परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले नाही, तर?

महाराष्ट्र शासनाने बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम २०११ मधील नियम - ३ व नियम १० मध्ये सुधारणा केलेली आहे. त्यानुसार, इयत्ता ५ वी व ८ वी वर्गासाठी वार्षिक परीक्षा असेल. जर बालक वार्षिक परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले नाही, तर त्यास अतिरिक्त पूरक मार्गदर्शन प्रदान करुन वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासून दोन महिन्यांच्या आत पुनर्परीक्षेची संधी देण्यात येईल.

बालक पुनर्परीक्षेत देखील नापास झाले, तर?

जर ते बालक पुनर्परीक्षेत देखील नापास झाले, तर त्याला इयत्ता ५ वी च्या वर्गात किंवा इयत्ता ८ वी च्या वर्गात, जसे असेल तसे ठेवले जाईल. मात्र प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत कोणत्याही बालकास शाळेतून काढून टाकले जाणार नाही, अशी तरतूद करण्यात आलेली आहे. या अनुषंगाने इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी साठी वार्षिक परीक्षा, पुनर्परीक्षा व मूल्यमापन कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे.

School Exam 2024

इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी साठी वार्षिक परीक्षा, पुनर्परीक्षा व मूल्यमापन कार्यपद्धती सन २०२३-२४ पासून लागू करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना दिनांक ७ डिसेंबर २०२३ रोजीच्या शालेय शिक्षण विभागाने जारी केल्या आहेत. (शासन निर्णय)

नवीन शैक्षणिक वर्षातील प्रवेशासंदर्भात; केंद्र सरकारचे सर्व राज्यांना निर्देश

महत्वाची अपडेट! आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेच्या नियमात बदल; अधिसूचना जारी

Previous Post Next Post