Pariksha Pe Charcha 2024 : परीक्षा पे चर्चा या नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे आयोजित कार्यक्रमाच्या माध्यमातून मा. पंत्र्प्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी देशभरातील विद्यार्थ्यांशी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी उत्तर दिले.
परीक्षांमधील ताण कसा टाळायचा? पंतप्रधान मोदींनी दिला 'हा' सल्ला
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यावेळी उपस्थित होते. मुंबईत राजभवन येथे आयोजित या कार्यक्रमात राज्यपाल रमेश बैस यांच्यासह शालेय विद्यार्थी सहभागी झाले. विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक स्पर्धा आवश्यक असल्याचे सांगून विद्यार्थ्यांनी प्रतिभावान मित्र वाढवावेत आणि त्यांच्यापासून प्रेरणा घ्यावी, असा सल्ला प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दिला.
कोणत्याही दबावाला मानसिक तयारीने जिंकता येते. विद्यार्थ्यांनी परीक्षांचा ताण न घेता नियमित सराव करून त्यात सुधारणा करीत राहिल्यास यश सहज साध्य करता येईल, असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तर देताना प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणाले, स्पर्धा नसेल तर जीवन चेतनाहीन बनेल. यासाठी विद्यार्थ्यांनी एकमेकांशी इर्षा न ठेवता स्वतःशी स्पर्धा करून प्रगती होण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करावेत, आत्मविश्वास बाळगावा, शिक्षणाबरोबरच आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी व्यायाम आणि खेळ यांचाही मेळ साधावा.
स्वस्थ मनासाठी स्वस्थ शरीराची आवश्यकता असून त्यासाठी सूर्यप्रकाश, पूर्ण झोप आणि संतुलित आहार या बाबी गरजेच्या असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. तंत्रज्ञानापासून आपल्याला दूर जाता येणार नाही, तथापि, त्याचा अती वापर टाळून योग्य वापर करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
तंत्रज्ञानाच्या वापरामुळे लिहिण्याचा सराव कमी होत आहे, याचा दुष्परिणाम परीक्षेमध्ये दिसून येतो. यासाठी विद्यार्थ्यांनी लिहिण्याचा सराव नियमित ठेवून ते तपासावे आणि त्यात सुधारणा कराव्यात, यामुळे परीक्षेत येणारा ताण निश्चित कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विद्यार्थ्यांना ताण येणार नाही यासाठी शिक्षक आणि पालकांची भूमिका देखील महत्त्वाची असल्याचे सांगून, श्री.मोदी यांनी त्यांना विद्यार्थ्यांसोबत सकारात्मक राहण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी बंध वाढवावेत. विद्यार्थ्यांची इतरांशी तुलना न करता त्यांच्यातील गुणांचे कौतुक करावे, यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल. विद्यार्थ्यांची तुकडी बदलते तथापि शिक्षक तेच असतात त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्यास त्यांच्यावरील ताण निश्चित कमी होऊ शकेल.
परीक्षा पे चर्चा लाईव्ह संपूर्ण कार्यक्रम येथे पहाकंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधन वाढणार, बजेट संदर्भात महत्वाची मिटिंग संपन्न
$ads={2}
अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित