Shaley Shikshan Vibhag GR : शालेय शिक्षण विभागाकडून तीन महत्वाचे शासन निर्णय निर्गमित

Shaley Shikshan Vibhag GR : शालेय शिक्षण विभागाने दिनांक २३ जानेवारी २०२४ रोजी बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार 2009 अन्वये वसतिस्थाने घोषित करण्याचा तसेच  पीएम श्री शाळा आणि राष्ट्रीय मतदार दिन या संदर्भात महत्वाचे शासन निर्णय निर्गमित केले आहे.

$ads={1}

बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार 2009 नुसार महत्वाचा निर्णय

Shaley Shikshan Vibhag GR

केंद्र शासनाचा बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क कायदा, २००९ व त्याअनुषंगाने तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम, २०११ मधील तरतुदीनुसार विद्यार्थ्यांना वाहतूक सुविधा अनुज्ञेय करण्याकरीता वसतिस्थाने घोषित करण्याचा महत्वपूर्ण निर्णय शालेय शिक्षण विभागाने दिनांक २३ जानेवारी २०२४ रोजी घेतला आहे.

या निर्णयानुसार राज्यातील ग्रामीण व शहरी क्षेत्रातील एकूण ३३६४ वसतिस्थाने (Habitations) व एकूण १९७९३ विद्यार्थी संख्या शासन निर्णयासोबत जोडलेल्या Annexure- A. Annexure-B, Annexure-C 4 Annexure-D मध्ये नमूद केल्यानुसार पात्र ठरविण्यात आली आहेत.

त्यानुसार इयत्ता १ ली ते ५ वी च्या विद्यार्थ्यांच्या वसतिस्थानाच्या (निवासस्थान) १ कि. मी. च्या परिसरात, इ. ६ वी ते इ.८ वी च्या विद्यार्थ्यांच्या वसतिस्थानाच्या ३ कि.मी. च्या परिसरात व इ. ९ वी व इ.१० वी च्या विद्यार्थ्यांच्या वसतिस्थानाच्या ५ कि.मी. च्या परिसरात शाळा उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाता यावे, यास्तव विद्यार्थ्यांना वाहतुक भत्ता देण्यासाठी सदरची वसतिस्थाने घोषित करण्यात आली आहेत. मात्र या शासन निणर्यामुळे कोणतीही शाळा बंद केली जाणार नाही, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. (शासन निर्णय पहा)

पीएम श्री शाळा संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय

पीएम श्री शाळा या केंद्र पुरस्कृत योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत निवड झालेल्या शाळांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची आदर्श स्वरुपात अंमलबजावणी करावयाची आहे. सदर योजना प्रामुख्याने ६ स्तंभांवर आधारित असून त्यापैकी प्रवेश आणि पायाभूत सुविधा हा महत्वाचा स्तंभ आहे.

केंद्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने पीएम श्री शाळा योजने संदर्भात प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक पुस्तिका-भाग २- implementation and Programmatic Guidelines अन्वये पीएम श्री शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना वाहतूक/मदतनीस सुविधा अनुज्ञेय करण्यात आली आहे. सद्यस्थितीत राज्यात या योजनेचा पहिला टप्पा राबविण्यात येत असून त्यात एकूण ५१६ शाळांचा समावेश आहे.

त्यानुसार प्राथमिक व उच्च प्राथमिक स्तरावरील ३९२८, तसेच माध्यमिक स्तरावरील ८०४ व उच्च माध्यमिक स्तरावरील ९१९ अशा एकूण ५६५१ विद्यार्थ्यांना पीएम श्री शाळा योजनेंतर्गत सन २०२४-२५ करीता वाहतूक/मदतनीस सुविधेचा लाभ अनुज्ञेय करण्यासाठी पात्र ठरविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. (शासन निर्णय)

राष्ट्रीय मतदार दिन

दि. २५ जानेवारी रोजी राज्यातील सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय मतदार दिन राबविण्याबाबत. सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. (शासन परिपत्रक पहा)

अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित

तलाठी भरती निकाल निवड यादी येथे पहा

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा