महत्वाची अपडेट! ग्रामरोजगार सेवकांच्या मागण्यांबाबत महत्वपूर्ण बैठक संपन्न

Rural Employment Workers : ग्रामरोजगार सेवकांच्या समस्यांबाबत रत्नसिंधू या शासकीय निवासस्थानी रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांच्या अध्यक्षतेखाली  दिनांक १७ जानेवारी रोजी बैठक झाली. या बैठकीस रोजगार हमी योजना विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, मिशन मनरेगाचे महासंचालक नंदकुमार यांच्यासह ग्रामरोजगार सेवक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

महत्वाची अपडेट! ग्रामरोजगार सेवकांच्या मागण्यांबाबत महत्वपूर्ण बैठक संपन्न

Rural Employment Workers

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून यासाठीचा निधी केंद्र शासनाकडून येत असल्याचे सांगून मंत्री श्री. भुमरे म्हणाले, ग्रामरोजगार सेवकांसाठी सर्वसमावेशक अशी विमा योजना सुरू करावी. 

दुर्दैवाने मजुराचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला योग्य ती मदत मिळण्यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी बँक, विमा कंपन्या यांच्याशी चर्चा करावी. निकषांवर आधारित विमा योजना तयार करावी. 

शासनाने ग्राम रोजगार सेवकाचे मानधन ग्रामपंचायतीस वितरीत केल्यानंतर ग्रामपंचायतीने हे मानधन 8 दिवसांच्या आत ग्राम रोजगार सेवकांच्या खात्यावर वर्ग करावे. यामध्ये 15 दिवसांपेक्षा जास्त कालावधी लागल्यास दंडाची तरतुदही करण्यात यावी अशा सूचना मंत्री श्री.भुमरे यांनी केल्या.

ग्राम रोजगार सेवकांच्या वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयातील ‘ग्राम रोजगार सेवक अर्धवेळ कर्मचारी राहील’ हा शब्दप्रयोग वगळण्याचे आदेश मंत्री श्री. भुमरे यांनी दिले.

हे ही वाचा : कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या सोडविणेबाबत महत्वाचे परिपत्रक

त्याचप्रमाणे ग्रामरोजगार सेवकांच्या दरमहा ठराविक मानधन या विषयीही सविस्तर चर्चा करण्यात आली. यासाठी नवीन शासन निर्णयानुसार रोजगार सेवकास पुरेशा प्रमाणात मानधन दिल्याचे दिसून आले. याबाबत क्षेत्रीय पातळीवर हा शासन निर्णय ग्राम रोजगार सेवकांपर्यंत सहज सुलभ पद्धतीने पोहोचवावा, अशा सूचनाही मंत्री श्री. भुमरे यांनी दिल्या.

ग्रामरोजगार सेवकांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून त्यांच्या वैयक्तिक विमा सारख्या मागणीबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी सांगितले.

जिल्हा परिषद भरती परीक्षांचे निकाल जाहीर, जिल्हानिहाय PDF येथे डाउनलोड करा - डायरेक्ट लिंक

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा