Income Tax Department Recruitment : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आता आयकर विभागात 10 वी ते पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे, यामध्ये विविध पदासाठी जाहिरात निघाली असून, पदनिहाय तब्बल 25,500 ते 1 लाख 42 हजार 400 पर्यंत पगार आहे, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे. या संधीचा तुम्ही अवश्य लाभ घेऊ शकता यासाठी जाहिरातीचे तपशील सविस्तर वाचा..
$ads={1}
दहावी ते पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!
आयकर विभाग भरती रिक्त पदांचा तपशील व वेतनश्रेणी पुढीलप्रमाणे
आयकर विभाग मुंबई संपूर्ण एकूण रिक्त जागा : 291
- आयकर निरीक्षक Inspector of Income-tax (ITI) : Level 7 (Rs.44,900-1,42,400) एकूण पदे 14
- स्टेनोग्राफर Stenographer Grade-II (Steno) : Level 4 (Rs.25,500-81,100) एकूण पदे 18
- कर सहाय्यक Tax Assistant (TA) : Level 4 (Rs.25,500-81,100) एकूण पदे 119
- मल्टी टास्किंग स्टाफ Multi-Tasking Staff (MTS) : Level 1 (Rs.18,000-56,900) एकूण पदे 137
- कॅन्टीन अटेंन्डट Canteen Attendant (CA) : Level 1 (Rs.18,000-56,900) एकूण पदे 03
आयकर विभाग भरती आवश्यक शैक्षणिक पात्रता
- आयकर निरीक्षक (ITI) : या पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा समकक्ष पात्रता धारण केलेली असणे आवश्यक आहे.
- स्टेनोग्राफर ग्रेड II (स्टेनो) : या पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून 12 वी उत्तीर्ण किंवा समकक्ष पात्रता धारण केलेली असणे आवश्यक आहे.
- कर सहाय्यक (TA) : या पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा समकक्ष पात्रता धारण केलेली असणे आवश्यक आहे.
- मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) : या पदासाठी दहावी किंवा समतुल्य पात्रता धारण केलेली असणे आवश्यक आहे.
- कॅन्टीन अटेंन्डट : या पदासाठी दहावी किंवा समतुल्य पात्रता धारण केलेली असणे आवश्यक आहे.
हे ही वाचा : महत्वाची अपडेट! या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत महत्वपूर्ण बैठक संपन्न, मंत्री महोदयांनी दिले महत्वाचे निर्देश
आयकर विभाग भरती महत्वाच्या तारखा
- ऑनलाइन अर्ज (Date of issue of Notification) : दिनांक 22 डिसेंबर 2023
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख (Last date) : दिनांक 19 जानेवारी 2024
ऑनलाईन अर्ज - जाहिरात महत्वाच्या लिंक
- आयकर विभाग मुंबई भरती PDF जाहिरात डाउनलोड करा
- ऑनलाईन अर्ज येथे करा
- अधिकृत वेबसाईट - https://incometaxmumbai.gov.in/