Talathi Result 2023 PDF Download : अखेर! तलाठी भरती परीक्षा निकाल गुणवत्ता यादी जाहीर, जिल्हानिहाय यादी डाउनलोड डायरेक्ट लिंक

Talathi Result 2023 PDF Download : राज्यातील तलाठी सरळसेवा भरती 2023 भरती अंतर्गत राज्यभरात जवळपास 4 हजार 993 जागांसाठी जाहिरात देण्यात आली होती, त्यानुसार जुलै ते सप्टेंबर महिन्यामध्ये एकूण 57 सत्रामध्ये परीक्षा घेणेत आलेली आहे. आता या परीक्षेची गुणवत्ता यादी महा भूमि (MahaBhumi) कार्यालयाकडून दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हानिहाय गुणवत्ता यादी डाउनलोड डायरेक्ट लिंक या लेखामध्ये दिलेली आहे.

$ads={1}

मोठी अपडेट! तलाठी भरती परीक्षा निकाल गुणवत्ता यादी जाहीर

Talathi Result 2023 PDF Download

तलाठी भरती परीक्षा संपल्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये (Talathi Result 2023 Final Answer Key) जाहीर करून, उत्तरसूचीसंबंधी काही आक्षेप / हरकतींबाबतची माहिती TCS कंपनीकडून प्राप्त झालेली होती. 

एकूण 2831 प्रश्नांसाठी 16205 आक्षेप उमेदवारांमार्फत नोंदविण्यात आलेले होते. सदर आक्षेपांपैकी एकूण वैध 146 प्रश्नांसाठी घेतलेले 9072 आक्षेप TCS कंपनीकडून वैध ठरविणेत आलेले आहेत. 

त्यानुसार आता दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी उमेदवारांना प्राप्त गुणांवर सामान्यीकरण प्रक्रिया पुर्ण करणेत आली असून, जिल्हानिहाय गुणवत्ता यादी प्रसिध्द करण्यात आली आहे.

तलाठी भरती परीक्षा निकाल गुणवत्ता यादी जिल्हानिहाय डाउनलोड डायरेक्ट लिंक - Talathi Result 2023 PDF Download

मा. सर्वोच्च न्यायालयात अनुसूचित क्षेत्रातील (पेसा कायदा लागू) 17 संवर्गातील सरळसेवा पदभरती अनुषंगाने दाखल याचिका मधील निर्णयास अधिन राहून अनुसूचित क्षेत्र (पेसा कायदा लागू) असणाऱ्या 13 जिल्हयामध्ये निवड यादी तयार करण्याचे काम सामान्य प्रशासन विभागाचे मान्यतेने नंतर करण्यात येणार आहे. 

मात्र उर्वरित 23 जिल्हयातील निवड यादी तयार करण्याचे काम नियमानुसार सुरु करणेत येत आहे. असे राज्य परीक्षा समन्वयक तथा अपर जमाबंदी आयुक्त, आणि अतिरिक्त संचालक भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य) पुणे यांनी काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

$ads={2}

अधिकृत संकेतस्थळ - https://mahabhumi.gov.in/mahabhumilink

'सिडको' महामंडळामध्ये करिअर करण्याची उत्तम संधी! या पदासाठी मोठी भरती सुरु

भारतीय रेल्वेत 'लोको पायलट' पदाच्या 5696 जागांसाठी भरती

जिल्हा परिषद भरती परीक्षांचे निकाल जाहीर, जिल्हानिहाय PDF येथे डाउनलोड करा - डायरेक्ट लिंक

महत्वाच्या अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Previous Post Next Post