Mahavitaran Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित या कंपनीने वरीष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली), तंत्रज्ञ १ (पारेषण प्रणाली) व तंत्रज्ञ २ (पारेषण प्रणाली) या पदांसाठी तब्बल 0444 जागांसाठी मोठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे.
$ads={1}
महापारेषण मध्ये तब्बल 0444 रिक्त पदांसाठी मोठी भरती सुरु
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित या कंपनीने कपंनीतील कर्मचा-यांना पुढील संधीच्या दृष्टीने सुधारीत कर्मचारी मानांक कार्यालयीन आदेश ०३ दि. १५.०६.२०२१ द्वारे प्रसारित केला आहे.
त्या नुसार कंपनीतील वेतनगट- ३ मधील मंडल स्तरीय सेवाजेष्ठतेतील वरीष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली), तंत्रज्ञ १ (पारेषण प्रणाली) व तंत्रज्ञ २ (पारेषण प्रणाली) ची अंतर्गत अधिसुचनेच्या कोटयातील रिक्त पदे एकत्रित करून अनुशेषाप्रमाणे भरण्यात येत आहेत.
महापारेषण भरती तपशील
पदाचे नाव : वरीष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली), तंत्रज्ञ १ (पारेषण प्रणाली) व तंत्रज्ञ २ (पारेषण प्रणाली)
एकूण रिक्त पदे : ०४४४
वेतनश्रेणी
- वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली) या पदावर निवड झालेल्या उमेदवारास रु. ३०८१०-१०६०-३६११०-११६०- ४७७१०-१२६५-८८१९० या वेतन श्रेणीत वेतन मिळेल.
- तंत्रज्ञ १ (पारेषण प्रणाली) या पदावर निवड झालेल्या उमेदवारास रु. २९९३५-९५५-३४७१०-१०६०- ४५३१०-११६०-८२४३० या वेतन श्रेणीत वेतन मिळेल.
- तंत्रज्ञ २ (पारेषण प्रणाली) या पदावर निवड झालेल्या उमेदवारास रु. २९०३५-७१०-३२५८५-९५५-४२१३५- १०६०-७२८७५ या वेतन श्रेणीत वेतन मिळेल.
- तसेच मुळ वेतनाव्यतिरिक्त महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वैद्यकीय भत्ता वगैरे अन्य भत्ते कंपनीच्या नियमाप्रमाणे लागु राहतील.
महापारेषण कंपनी मधील अनुभवी व विहीत शैक्षणिक अर्हता धारण करणारे कर्मचारी/उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज ऑनलाईन पध्दतीने मागविण्यात येत आहेत. कंपनी अंतर्गत एकूण ७ परिमंडल (अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर, कराड, पुणे, वाशी) कार्यालये आहेत.
भरती प्रक्रियेचा कार्यक्रम
- अर्जदारांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी कंपनीच्या संकेतस्थळाची उपलब्धता : दिनांक ३१.०१.२०२४ पासून दिनांक ०९.०२.२०२४ पर्यंत. (रात्री ११.५९ मिनीटांपर्यत)
- ऑनलाईन परीक्षेची अंदाजीत तारीख : फेब्रुवारी / मार्च - २०२४
ऑनलाईन अर्ज
- उमेदवारास ऑनलाईन अर्ज भरतेवेळी प्रथम ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन करणे आवश्यक राहील.
- नोंदणी करण्यासाठी उमेदवारांनी "CLICK HERE FOR NEW REGISTRATION" वर क्लिक करुन नोंदणी करावी.
- नोंदणी करतांना उमेदवाराने स्वतःचे नाव, पत्ता, ईमेल, व भ्रमणध्वणी क्रमांक काळजीपुर्वक भरावा.
- नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उमेदवारास त्याने नमूद केलेल्या भ्रमणध्वनी क्रमांक व ई-मेल वर पुढील प्रक्रियेकरता नोंदणी क्रमांक व पासवर्ड देण्यात येईल. त्यामुळे उमेदवाराने सदर नोंदणी क्रमांक व पासवर्ड याची नोंद आपल्याकडे काळजीपुर्वक करून ठेवावी.
मूळ जाहिरात डाउनलोड करा
अधिकृत वेबसाईट : https://www.mahatransco.in/
ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक
नमो महारोजगार मेळाव्यांमधून 2 लाख रोजगार, महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचे रोजगार मेळावे येथे पहा
'सिडको' महामंडळामध्ये करिअर करण्याची उत्तम संधी! या पदासाठी मोठी भरती सुरु
$ads={2}
भारतीय रेल्वेत 'लोको पायलट' पदाच्या 5696 जागांसाठी भरती