Anganwadi Aasha Sevika Budget News : भारताच्या अमृत कालमधील या अंतरिम अर्थसंकल्पाने विकसित भारताच्या आकांक्षा आणि संकल्पांची पूर्तता करण्यासाठी भक्कम आधार प्रस्थापित केला आहे. या अर्थसंकल्पात सर्व आशा व अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस कर्मचारी यांच्यासाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे.
$ads={1}
राज्यातील सर्व आशा व अंगणवाडी सेविकांसाठी गुड न्यूज!
यंदाचा अर्थसंकल्प वंचितांना प्राधान्य देणारा आणि आशावादी समाज, गरीब, खेडी आणि मध्यमवर्गी यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. यावर्षीचे बजेट मध्यमवर्गीयांना, कृषी क्षेत्राला, युवा वर्गाला, आदिवासी आणि मागासवर्गीयांना न्याय देणारा अर्थसंकल्प आहे.
तसेच आयुष्मान भारतचा लाभ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही योजना सर्व आशा, अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांपर्यंत पोहोचवली जाणार असल्यामुळे या अर्थसंकल्पातून सर्वसामान्य माणसाला दिलासा मिळाला आहे, असे मत केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि जनजातीय कार्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी व्यक्त केले असल्याचे शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
गुड न्यूज! आशा स्वयंसेविकांना आरोग्य सेवेसाठी ई-स्कुटरया अर्थसंकल्पात प्रामुख्याने, भारतीय अर्थव्यवस्थेचे सकारात्मक परिवर्तन हा अंतरिम अर्थसंकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या @2047 च्या दृष्टीकोनाला पुढे नेणारा अर्थसंकल्प असून यात 'सबका साथ, सबका विकास' या केंद्र सरकारच्या ब्रीदवाक्याच्या अनुषंगाने गरीब, तरुण, अन्नदाता आणि महिला (ज्ञान) यांचा समावेश केला आहे.
- येत्या 5 वर्षात दोन कोटी घरे बांधली जाणार
- आयुष्मान भारत योजनेंतर्गत आरोग्य कवच अंगणवाडी सेविकांनाही लागू
- सोलर योजनेतून । कोटी नागरिकांना मोफत वीज दिली जाणार
- 9 ते 14 वर्षाच्या मुलींना गर्भाशय कॅन्सरची लस दिली जाणार
- मत्स्य निर्यातीला प्रोत्साहन देणार
- स्वावलंबनाला गती देण्यासाठी नवीन योजना सुरू करणार
- 7 लाखांच्या वार्षिक उत्पन्नावर कर भरावा लागणार नाही.
#Budget2024 #ViksitBharatBudget
— PIB India (@PIB_India) February 1, 2024
Ayushman Bharat
Health care cover under Ayushman Bharat to be extended to all ASHA workers, all Anganwadi workers and helpers
- Finance Minister