Contractual Employees Regularization : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आकृतीबंधानुसार रिक्त असलेल्या पदांवर आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियमित समावेशन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय दिनांक 2 फेब्रुवारी 2024 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.
$ads={1}
राज्यातील या कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत केले नियमित
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आस्थापनेवर करार पध्दतीने कंत्राटी तात्पुरत्या स्वरूपात वेतनश्रेणी, किमान वेतन व ठोक मानधनावर कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या विहीत मार्गाने (जाहिरात/लेखी परिक्षा/ मुलाखत) झालेल्या नियुक्त्या व त्यांच्या सेवा विचारात घेऊन प्रस्तावातील वैद्यकीय अधिकारी यांनी आकृतीबंधातील मंजूर व रिक्त पदांवर कायम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय दिनांक 2 फेब्रुवारी 2024 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आस्थापनेवर अस्थायी स्वरूपात कार्यरत वैद्यकीय अधिकारी पदावर करार पध्दतीने (कंत्राटी) तात्पुरत्या स्वरूपात वेतनश्रेणी, किमान वेतन व ठोक मानधनावर कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांना, इतर महानगरपालिकांमध्ये ज्याप्रमाणे रोजंदारीवरील कार्यरत कर्मचाऱ्यांचे कायमस्वरूपी समावेशन करण्यात आले आहे.
त्याच धर्तीवर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेमधील करार पध्दतीवरील (कंत्राटी) तात्पुरत्या स्वरूपातील कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकाऱ्यांना, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आकृतीबंधातील मंजूर व रिक्त पदावर नियमित समावेशन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- या कर्मचाऱ्यांना आकृतीबंधात मंजूर वैद्यकीय अधिकारी पदावर शासन निर्णयाच्या दिनांकापासून म्हणजेच दिनांक 2 फेब्रुवारी 2024 पासून नियुक्ती देण्यात येणार आहे.
- या वैद्यकीय अधिकाऱ्यांना पदस्थापनेच्या दिनांकापासून कायम सेवेचे तद्नुषंगिक लाभ (वेतन, सेवा जेष्ठता, निवृत्तीवेतन इत्यादी) देय असणार आहे.
- मात्र सदर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी यापूर्वी केलेल्या सेवेचे कोणतेही लाभ अथवा थकबाकी अनुज्ञेय नसेल. (शासन निर्णय)
राज्यातील या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समायोजन होणार, महत्वाचे निर्देश पहा