Contractual Employees Salary News : राज्यातील आयटीआय कंत्राटी निदेशकांचे मानधनात तब्बल 10000 हजार रुपयांची भरघोस वाढ करण्यात आली आहे, कर्मचाऱ्यांना या सुधारित मानधनाचा लाभ दिनांक 1 एप्रिल 2023 पासून मिळणार आहे, याबाबतचा सुधारित शासन निर्णय दिनांक 7 फेब्रुवारी 2024 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.
$ads={1}
कंत्राटी निदेशकांचे मानधनात तब्बल 10 हजारांची वाढ !
आयटीआय कंत्राटी निदेशकांच्या मानधनात भरीव वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे आयटीआय कंत्राटी निदेशकांना मिळणाऱ्या 15 हजार रुपये मानधनावरून आता 10 हजार रुपयांची भरीव वाढ करण्यात आली आहे. सदरचा वाढीव मानधन लाभ दिनांक 1 एप्रिल 2023 पासून देण्यात येणार आहे. याबाबत दिनांक 7 फेब्रुवारी 2024 रोजी सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
आता यामध्ये सुधारणा करून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधील दुसरी व तिसरी पाळीतील कंत्राटी शिल्पनिदेशकांच्या मानधनात वाढ करणेबाबत यापूर्वीच शासन निर्णय दिनांक 4 जुलै 2023 रोजी निर्गमित केला होता. त्यामध्ये परिच्छेद क्र. 2 मध्ये पुढीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे. सदर शासन निर्णयामधील परिच्छेद क्र. 2 पुढीलप्रमाणे आहे.
तथापि, सदर कंत्राटी निदेशक यांनी शासनाला मानधनवाढीबाबत वारंवार दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने राज्यातील महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये दुसरी व तिसरी पाळी साठी कंत्राटी तत्वावर घेण्यात आलेल्या शिल्पनिदेशकांचे मानधन वाढीबाबत मंत्रिमंडळाच्या दिनांक १६.०५.२०२३ रोजी झालेल्या बैठकीत पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे. असा आहे. ऐवजी
शासन शुद्धीपत्रक
तथापि सदर कंत्राटी निदेशक यांनी शासनाला मानधनवाढीबाबत वारंवार दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने राज्यातील महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये दुसरी व तिसरी पाळी तसेच उर्वरित ठिकाणच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये दुसरी पाळी करीता कंत्राटी तत्वावर घेण्यात आलेल्या शिल्पनिदेशकांचे मानधन वाढीबाबत मंत्रिमंडळाच्या दिनांक १६.०५.२०२३ रोजी झालेल्या बैठकीत पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे. असे वाचण्यात यावे. (शासन निर्णय)
राज्यातील या कंत्राटी पदांच्या मानधनात तब्बल 8 हजार रुपयांची वाढ; शासन निर्णय जारी
रोजंदारी तत्वावरील कर्मचारी शासन सेवेत कायम निर्णय पहा