Contract Employees Salary Increase : कारागृह विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात 8 हजार रुपयांची वाढ करण्याचा शासन निर्णय दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.
$ads={1}
राज्यातील या कंत्राटी पदांच्या मानधनात तब्बल 8 हजार रुपयांची वाढ
कारागृह विभागातील अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे या कार्यालयाच्या आथापनेवरील विधि अधिकारी, गट ब हे सदर पद कंत्राटी स्वरूपात असून, सदर पदाच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
कारागृह विभांगातील कंत्राटी स्वरूपात भरण्यात येणाऱ्या विधि अधिकारी, गट ब या पदासाठी मासिक वेतन अधिक दुरध्वनी व प्रवास खर्च एकत्रित मानधन देण्यात येते.
सद्या या पदासाठी मासिक वेतन रू.१५,०००/- + दुरध्वनी व प्रवास खर्च रू. ५,०००/- असे एकत्रित रु.२०,०००/- प्रमाणे मानधन अदा करण्यात येते.
सुधारित मानधनधनानुसार आता मासिक वेतन रू.२५,०००/- + दुरध्वनी व प्रवास खर्च रू. ३,०००/- असे एकत्रित रु २८,००० मानधन देण्यात येणार आहे. (शासन निर्णय)
राज्यातील या कर्मचार्यांना शासन सेवेत नियमित करण्यासंदर्भात महत्वाची बैठक संपन्न