Asha Worker : मागील सात दिवसांपासून हजारो आशा (Asha workers) सेविकांचे विविध मागण्यांसाठी आझाद मैदानात ठिय्या आंदोलन सुरु आहे. आशासेविका व गटप्रवर्तकांच्या मागण्या संदर्भात कॅबिनेटमध्ये चर्चा झाली. सरकार सकारात्मक असल्याचे सांगण्यात आले. मात्र, शासन निर्णय जारी केल्याशिवाय आझाद मैदान सोडणार नाही, अशी भूमिका घेत हजारो आशासेविका बुधवारी आंदोलनाच्या निर्णयावर ठाम राहिल्या आहेत.
$ads={1}
राज्यातील आशा वर्कर यांच्या मागण्या ताबडतोब सोडवुन न्याय द्यावा - खासदार सुप्रिया सुळे
आशा भगिनींनी आपल्या न्याय्य हक्कांसाठी महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक कृती समितीच्या माध्यमातून आझाद मैदान, मुंबई येथे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला एका बहिणीच्या नात्याने भेट देऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. शासनाने या भगिनींचे म्हणणे ऐकून घेण्याची गरज आहे. एका गरीबाच्या घरात चुल पेटत नाही तेंव्हा काय होतं हे दुःख इतरांना समजणार नाही. शासनाने या अंगणवाडी आणि आशा भगिनींच्या मागण्या मान्य करुन त्यांना न्याय द्यावा ही नम्र विनंती. अशी मागणी मा. खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
आशासेविका निर्णयावर ठाम
राज्यातील जवळपास ३० हजार आशा वर्कर आणि गटप्रवर्तकांनी शासनाने केलेल्या घोषणांची अंमलबजावणी व्हावी, यासाठी शासन निर्णय जाहीर करा, अशी मागणी करीत शहापूर ते मुंबई लाँग मार्च काढला होता. दरम्यान, ठाणे येथे मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसानिमित शुभेच्छा देऊन दोन दिवस महामुक्काम आंदोलन देखील केले.
त्यानंतर हजारो आशासेविका आझाद मैदानात दिवस-रात्र आंदोलन करीत आहेत. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आशासेविकांच्या आंदोलनावर चर्चा झाली, नेमके बैठकीत काय झाले? यासाठी येथे पहा संपूर्ण व्हिडिओ पहा
राज्यातील या कंत्राटी पदांच्या मानधनात तब्बल 8 हजार रुपयांची वाढ; शासन निर्णय जारी
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी!