अंगणवाडी सेविका आणि मदतनीस कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! केंद्र सरकारचे विविध उपक्रमांद्वारे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना प्रोत्साहन

Anganwadi Employees Salary : अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचाऱ्यांच्या मानधनाबाबत मा. सदस्य श्री व्ही. विजयसाई रेड्डी यांनी राज्यसभेत अतारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला होता,  याबाबत महत्वाची माहिती केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात दिली, त्यानुसार देशात 31 डिसेंबर 2023 पर्यंत 13,48,135 अंगणवाडी सेविका आणि 10,23,068 अंगणवाडी मदतनीसांची नोंद आहे. त्यानुसार राज्यनिहाय अंगणवाडी कर्मचारी संख्या व केंद्राद्वारे देण्यात येणारे मानधन व इतर सुविधा आणि राज्यनिहाय अतिरिक्त मानधन सुविधा याबाबत सविस्तर पाहूया..

$ads={1}

केंद्र सरकारचे विविध उपक्रमांद्वारे अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांना प्रोत्साहन

Anganwadi Employees Salary

अंगणवाडी सेवा ही केंद्र पुरस्कृत योजना असून, तिची अंमलबजावणी राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेश प्रशासनाच्या अंतर्गत येते. विविध स्तरांवरील रिक्त पदे भरण्याबाबतचा मुद्दा राज्य सरकारे/केंद्रशासित प्रदेश प्रशासनाकडे सातत्यपूर्ण चर्चा/दूरदृश्य प्रणालीद्वारे उचलला जातो. तसेच, मनुष्यबळाच्या योग्य नियोजनाची खातरजमा करण्यासाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या संदर्भात दर वर्षी 30 एप्रिल ही एकच सेवानिवृत्ती तारीख स्वीकारण्याची विनंती राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना करण्यात आली आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्य सरकारने याबाबतचा शासन निर्णय दिनांक १३ डिसेंबर २०२३ रोजी निर्गमित केला आहे.

अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांच्या संख्येची राज्यनिहाय आकडेवारी

देशात 31 डिसेंबर 2023 पर्यंत 13,48,135 अंगणवाडी सेविका आणि 10,23,068 अंगणवाडी मदतनीसांची नोंद आहे.

State-wise list of number of Anganwadi Workers and Anganwadi Helpers

केंद्राकडून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना देण्यात येणारे मानधन

केंद्र सरकारने 1 ऑक्टोबर, 2018 पासून, प्रमुख अंगणवाडी केंद्रातील अंगणवाडी सेविकांचे मानधन रु.3,000/- वरून रु.4,500/- प्रति महिना केले आहे.

तसेच मिनी अंगणवाडी केंद्रातील अंगणवाडी सेविकांचे मानधन रु.2,250/- वरून रु.3,500/- प्रति महिना, तर अंगणवाडी मदतनिसांचे मानधन रु. 1,500/- वरून रु. 2,250/- प्रति महिना केले असून अंगणवाडी मदतनीसांसाठी रु. 250/- प्रति महिना आणि अंगणवाडी सेविकांसाठी रु. 500/- असे कामगिरीशी  निगडित प्रोत्साहन सुरू केले.

अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना राज्ये/केंद्रशासित प्रदेशांद्वारे प्रदान केलेले अतिरिक्त मानधन

राज्ये/केंद्रशासित प्रदेश या कार्यकर्त्यांना त्यांच्या स्वतःच्या संसाधनांमधून अतिरिक्त आर्थिक प्रोत्साहन/मानधन देखील देत आहेत जे राज्यानुसार वेगवेगळे आहे. राज्ये/केंद्रशासित प्रदेशांद्वारे प्रदान केलेले अतिरिक्त मानधन पुढीलप्रमाणे

(ही माहिती दिनांक 23 डिसेंबर च्या पोषण ट्रॅकरनुसार आहे, त्यामुळे यामध्ये बदल होऊ शकतो. Data as per Poshan Tracker (Dec. 23)

State-wise list of number of Anganwadi Workers and Anganwadi Helpers

सध्या महाराष्ट्र राज्यातील ८१ हजार आशा स्वयंसेविका आणि साडेतीन हजार गटप्रवर्तक कार्यरत आहेत. आशा सेविकांसाठी ३५०० तर गटप्रवर्तकांचे मासिक मानधन ४ हजार रुपये आहे. त्यात प्रत्येकी दीड हजार रुपये वाढ. अंगणवाडी सेविकांचे मानधन ८ हजार ३२५ रुपयांवरून १० हजार रुपये तर मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन ५९७५ वरून ७२०० रुपये तर अंगणवाडी मदतनिसांचे मानधन ४४२५ वरून ५५२५ रुपये करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे.

राज्यातील आशा वर्कर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात महत्वाची अपडेट

अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना इतर लाभ

अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने, खालील गोष्टींसह विविध पाऊले/उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.

  • पदोन्नती, रजा, गणवेश, सामाजिक सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत विमा संरक्षण,प्रधान मंत्री श्रम योगी मान-धन, पोषण ट्रॅकरद्वारे माहिती तंत्रज्ञानाचा लाभ इ.
  • सरकारने मिनी अंगणवाडी केंद्रांचे नियमित अंगणवाडी केंद्रात अद्ययावतीकरण करण्याचे आदेश जारी केले आहेत. यामुळे, सध्याच्या छोट्या अंगणवाड्यांमधील सेविकांचे मानधन प्रति महिना रु.4,500/- पर्यंत वाढले आहे.
  • सन 2024-25 च्या अंतरिम अर्थसंकल्पात, सरकारने देशभरातील सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा समावेश करण्यासाठी आयुष्मान भारतची व्याप्ती वाढवली आहे. हे दुय्यम आणि तृतीयक वैद्यकीय सेवेसाठी सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांना प्रति कुटुंब वार्षिक 5 लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य कवच मिळणार आहे.

महिला आणि बालविकास मंत्री स्मृती झुबिन इराणी यांनी याबाबत राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे.

$ads={2}

आरोग्य विभाग भरती ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ; लगेच करा अर्ज

Previous Post Next Post