Contract Employee Salary GR : राज्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या (Contract Employee) मानधन वाढीचा प्रलंबित निर्णय राज्य शासनाने घेतला असून, तसा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे, समग्र शिक्षा कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढीचा निर्णय घोषित झाल्यानंतर ही वाढ कधीपासून मिळणार? कधी मिळणार? याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा सुरू होती, मात्र शासन आदेशानुसार आता फरकासह मानधन वाढ कधीपासून मिळणार याबाबत आदेशात नमूद करण्यात आले आहे, सविस्तर वाचा.
$ads={1}
कंत्राटी कर्मचाऱ्यांना 'या' तारखेपासून फरकासह मानधन वाढ मिळणार, शासन आदेश जारी
समग्र शिक्षा अंतर्गत राज्य स्तरावरील कार्यालयात ६४ व जिल्हा स्तरावरील कार्यालयात ६१८७ असे एकूण ६२५१ कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचा-यांच्या मानधनात १० टक्के वाढ करण्याबाबतचा निर्णय सप्टेंबर महिन्यात शासनाने घेतला होता.
मात्र निधी उपलब्ध नसल्याने SSA कर्मचारी या निर्णयाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होणार? याच्या प्रतीक्षेत होते. दिनांक 5 फेब्रुवारी 2024 रोजी अखेर राज्य शासनाने या कर्मचा-यांच्या फरकासह मानधनात १० टक्के वाढ याप्रमाणे निधी मंजूर करण्यात आला आहे.
समग्र शिक्षा (सर्व शिक्षा अभियान) ही केंद्र पुरस्कृत योजना देशभरात २०००-२००१ सालापासून राबविण्यात येत असून, त्यानंतर राज्यात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दिनांक १८.१.२००२ च्या शासन निर्णयान्वये सर्व शिक्षा अभियानाची अंमलबजावणी राज्यात करण्याचा निर्णय घेण्यात आला व सदर अभियानाच्या अंमलबजावणीची जबाबदारी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
मानव संसाधन विकास मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या उपरोक्त नमूद मार्गदर्शक सूचनांच्या आधारे प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद सेवा नियमावली, १९९४ नुसार व्यवस्थापनांतर्गत मंजूर असलेल्या पदांपैकी काही पदे प्रतिनियुक्तीने तर काही पदे करार/कंत्राटी पद्धतीने भरण्यात आली आहेत.
कंत्राटी कर्मचा-यांना केंद्र शासनाने मंजूर केलेल्या एकक दराने मानधन अनुज्ञेय
सदर कंत्राटी कर्मचा-यांना केंद्र शासनाने मंजूर केलेल्या एकक दराने मानधन अनुज्ञेय आहे. सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाकरिता समग्र शिक्षा योजनेंतर्गत सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात कार्यक्रम व व्यवस्थापनांतर्गत मंजूर कार्यरत कर्मचा-यांच्या मानधनात १०% वाढ करण्यास कार्यकारी समितीने मान्यता दिली आहे.
कार्यकारी समितीने दिलेल्या मान्यतेनुसार सदर कंत्राटी कर्मचा-यांच्या मानधन वाढीचा प्रस्ताव केंद्रशासनास सादर करण्यात आला असता केंद्र शासनाने सदर प्रस्ताव अमान्य केला आहे.
तसेच सन २०२०-२१ मध्ये प्रकल्प मान्यता मंडळाने निश्चित केलेल्या मानधनात वाढ होणार नाही, यास्तव, सदर कंत्राटी कर्मचा-यांच्या मानधनात होणाऱ्या वाढीचा आर्थिक भार राज्य शासनाने स्वतंत्ररित्या उचलावा, असे नमूद केले आहे.
'या' तारखेपासून फरकासह मानधन वाढ मिळणार
त्यानुसार समग्र शिक्षा, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचारी यांच्या सध्याच्या मानधनात १० टक्के वाढ करण्यास राज्य शासनाने शासन निर्णय दि.१८ सप्टेंबर २०२३ अन्वये शासन निर्णयाच्या दिनांकापासून शासन मान्यता देण्यात आली आहे. म्हणजेच या कर्मचाऱ्यांना दिनांक १८ सप्टेंबर २०२३ पासून १० टक्के वाढीव मानधनासह फरक मिळणार आहे.
समग्र शिक्षा अंतर्गत व्यवस्थापन व कार्यकमातंर्गत करार पध्दतीने सद्यस्थितीत कार्यरत कर्मचा-यांच्या मानधनात १० टक्के वाढ करण्यात आलेली आहे. सदर वाढीकरीता फरकाची रक्कम रु. १०,८३,१९,७३७/- इतका निधी वितरीत करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. (शासन निर्णय)
राज्यातील या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समायोजन होणार, महत्वाचे निर्देश पहा
मोठा निर्णय! राज्यातील या कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत केले नियमित, शासन निर्णय