Old Pension Scheme GR : राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची अपडेट बातमी, दिनांक १ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून, याबाबतचा शासन निर्णय दिनांक २ फेब्रुवारी २०२४ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.
$ads={1}
मोठी बातमी! १ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू , राज्य शासनाचा महत्वपूर्ण निर्णय!
दि. ३१.१०.२००५ रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्य शासनाच्या सेवेत दि. ०१.११.२००५ रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणान्या कर्मचा-यांसाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर नवीन अंशदान निवृत्तीवेतन योजना राज्यात लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
केंद्र शासनाने दि. ०३.०३.२०२३ रोजीच्या कार्यालयीन ज्ञापनान्वये केंद्र शासनाच्या अधिकारी/कर्मचारी यांची नियुक्ती (Appointed) ज्या पदावर किंवा रिक्त जागेवर करण्यात आली आहे, ज्याची जाहिरात/भरतीची/नियुक्तीची अधिसूचना नवीन पेन्शन योजना लागू करण्याच्या अधिसूचनेच्या दिनांकापूर्वी म्हणजेच २२.१२.२००३ पूर्वी निर्गमित झाली आहे व जे दि. ०१.०१.२००४ रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत दाखल झाले व ज्यांना नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू झाली त्या केंद्र शासनाच्या अधिकारी/कर्मचारी यांना केंद्रीय नागरी सेवा (निवृत्ती) नियम, १९७२/२०२१ लागू करण्याचा एक वेळ पर्याय देणेबाबत (One Time Option) निर्णय घेतला आहे.
सदर केंद्र शासनाच्या निर्णयाच्या धर्तीवर दि. ०१.११.२००५ पूर्वी पदभरती जाहिरात/अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी राज्य शासनाच्या सेवेत दि. ०१.११.२००५ रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करणेची बाब विचाराधीन होती, याबाबत मा. मंत्रीमंडळाने दि. ०४ जानेवारी, २०२४ रोजीच्या बैठकीत मंजुरी दिली असून, त्यानुसार शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब विचारधीन होती, याबाबतचा शासन निर्णय खालीलप्रमाणे आहे.
दि. १ नोव्हेंबर २००५ पूर्वी पदभरती जाहिरात/अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दि. १ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करणेबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
सदर शासन निर्णय मा. मंत्रीमंडळाने दि. ०४ जानेवारी, २०२४ रोजीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात आला आहे. (शासन निर्णय)
जुनी पेन्शन योजना लेटेस्ट शासन निर्णय
गुड न्यूज! कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात तब्बल 10 हजारांची वाढ; सुधारित शासन निर्णय