Namo Maharojgar Melava : छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे व कोकण या विभागांमध्ये महारोजगार मेळावे आयोजित करण्यास नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
$ads={1}
नमो महारोजगार मेळाव्यांमधून 2 लाख रोजगार, स्वयंरोजगार निर्माण करणार
यापुर्वी नागपूर येथे प्रथमच राज्यस्तरीय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेऊन चालू वर्षी प्रत्येक महसुली विभागात एक या प्रमाणे सहा नमो महारोजगार मेळावे देखील आयोजित करण्याचे ठरले.
या मेळाव्यांमार्फत राज्यातील किमान दोन लाख उमेदवारांना रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यात येईल.
या मेळाव्यांसाठी प्रति मेळावा पाच कोटी याप्रमाणे तीस कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. या मेळाव्यांसाठी विविध विभागांवर जबाबदारी देण्यात आली असून उद्योजकांसह विविध घटकांना सहभागी करून घेण्यात येत आहे.
महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचे रोजगार मेळावे येथे पहा
महाराष्ट्रातील तरुणांसाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत तरुणांसाठी २ लाख रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध होणार आहे. यामध्ये आठवी ते पदवीधारक व आयटीआय , तसेच संबंधित डिप्लोमा, डिग्री कोर्स झालेल्या तरुणांना सहभागी होता येणार आहे. यांसदर्भात महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातील नमो रोजगार मेळाव्याची अधिकृत माहिती https://rojgar.mahaswayam.gov.in/ या संकेतस्थळावर देण्यात येते. तेव्हा अवश्य येथे वेळोवेळी भेट देऊन तुम्ही रोजगार मेळाव्याचा लाभ घेऊ शकता. (शासन निर्णय)
नमो महारोजगार मेळाव्याचे ठाणे येथे 24 व 25 फेब्रुवारी रोजी आयोजन, इच्छुक उमेदवारांनी येथे करा नोंदणीआरोग्य विभागामध्ये 1729 पदांची मेगा भरती
राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) पुणे अंतर्गत पर्मनंट नोकरीची संधी!$ads={2}
आरोग्य भरती निकाल निवड व प्रतीक्षा यादी विभागनिहाय PDF डाउनलोड करा'सिडको' महामंडळामध्ये करिअर करण्याची उत्तम संधी! या पदासाठी मोठी भरती सुरु
भारतीय रेल्वेत 'लोको पायलट' पदाच्या 5696 जागांसाठी भरती