Anganwadi Employees Latest GR : केंद्र शासनाने दिलेल्या मान्यतेनुसार पोषण अभियान या केंद्र पुरस्कृत कार्यक्रमाची राज्यात अंमलबजावणी सुरु आहे. राज्यातील अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका / मुख्यसेविका व तांत्रिक मनुष्यबळ यांच्यासाठी राज्य शासनाने महत्वपूर्ण निर्णय घेतला असून, याबाबतचा शासन निर्णय दिनांक 25 जानेवारी 2024 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.
अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका (मुख्यसेविका) व तांत्रिक मनुष्यबळ यांच्यासाठी राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय
पोषण अभियानांतर्गत निर्धारित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असून, त्यापैकी ICT - Real Time Monitoring या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात राज्यातील सर्व अंगणवाडी सेविका व मुख्यसेविका, तांत्रिक मनुष्यबळ यांचेकरिता स्मार्ट मोबाईल फोन खरेदी करण्यात आले होते. मात्र सदर मोबाईल फोनची वॉरन्टी संपुष्टात आली होती.
आता पोषण अभियानांतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील राज्यातील अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका / मुख्यसेविका, तांत्रिक मनुष्यबळ यांना स्मार्ट मोबाईल फ़ोन उपलब्ध करून देण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे.
पोषण अभियान या केंद्र पुरस्कृत उपक्रमांतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील राज्यातील अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका / मुख्यसेविका व तांत्रिक मनुष्यबळ यांना मोबाईल फ़ोन उपलब्ध करून देण्याकरिता राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेच्या अनुषंगाने L1 निविदाधारक में एन. एफ. इन्फ्राटेक सर्व्हिस प्रा. लि. न्यू दिल्ली यांचेकडून SAMSUNG Galaxy A05S या मॉडेलचे मोबाईल फोन प्रति मोबाईल रु.१३४५७.५३ (सर्व करासहित) प्रमाणे एकूण १,१४,९७४ एवढे मोबाईल फोन खरेदी करण्यास व त्याकरिता येणाऱ्या रुपये १५४,७२,६६,०५४/- (अक्षरी रुपये एकशे चोपन्न कोटी बहात्तर लाख सहासष्ट हजार चोपन्न फक्त) एवढया खर्चास शासनाने मान्यता देण्यात आली आहे. (शासन निर्णय)
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळणार पेन्शन, संप मागे घेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आनंद..