National Voters Day 2024 : राज्यातील सर्व कामगार संघटना व कामगार मंडळासाठी शासन परिपत्रक

National Voters Day 2024 : राज्यातील सर्व कामगार संघटना व कामगार मंडळ यांनी दि. २५ जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिन राबविण्याबाबत महत्वाचे शासन परिपत्रक काढण्यात आले आहे.

$ads={1}

राष्ट्रीय मतदार दिन राबविण्याबाबत महत्वाचे शासन परिपत्रक

National Voters Day 2024

दि.२५ जानेवारी, १९५० रोजी भारत निवडणूक आयोगाची स्थापना झाली. भारत निवडणूक आयोगाचा हा स्थापना दिवस २०११ पासून संपूर्ण देशभरात राष्ट्रीय मतदार दिन (National Voters Day) म्हणून साजरा केला जातो. 

राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश हा मतदारांना, विशेषतः नवमतदारांना मतदार यादीत नाव नोंदणीसाठी प्रोत्साहन देणे, सुलभरीत्या त्यांची नाव नोंदणी करून घेणे, हा आहे. 

देशातील मतदारांना समर्पित केलेल्या या दिवसाचा उपयोग मतदारांचा निवडणूक प्रक्रियेतील सहभाग वाढावा म्हणून त्यांना जागरूक करण्यासाठी केला जातो. राष्ट्रीय मतदार दिनाच्या कार्यक्रमात नवमतदारांचा सत्कार करून त्यांना मतदार ओळखपत्र दिले जाते.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय मतदार दिनाचे महत्त्व राज्यातील सर्व कामगार संघटना व कामगारमंडळामध्ये रुजावे यासाठी दि. २५ जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिन दरवर्षी अनिवार्यपणे साजरा करण्याबाबत पुढीलप्रमाणे कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

  1. कामगार संघटना व कामगारमंडळाच्या मतदार जागृती मंडळांतर्गत राष्ट्रीय मतदार दिनाचा कार्यक्रम घेण्यात यावा.
  2. कामगार संघटना व कामगारमंडळामधील अधिकारी / कर्मचारी यांच्यामध्ये मताधिकार, निवडणूक, लोकशाही याविषयी जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी विविध स्पर्धा घेण्यात याव्यात निबंध, वक्तृत्य, रांगोळी, चित्रकला, भित्तिपत्रक (पोस्टर), रील (एक मिनिटांचे व्हिडिओ), मीम, गाणे, विडंबन काव्य, घोषवाक्य इ. स्पर्धा.
  3. मताधिकार, लोकशाही यांसंबंधी परिसंवाद, व्याख्यान यांचे आयोजन करावे.
  4. आस्थापनामधील अधिकारी, कर्मचारी यांच्यासोबत लोकशाहीवर निष्ठा ठेवण्यासंबंधी शपथ घेण्याचा कार्यक्रम घेण्यात यावा. (मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांतील शपथेचा नमुना सोबत जोडलेल्या परिशिष्टात देण्यात आलेला आहे.)
  5. आस्थापनांना उपरोल्लिखित उपक्रमांशिवाय इतरही पद्धतीने राष्ट्रीय मतदार दिन साजरा करता येईल. तसेच, सदर कार्यक्रम साजरा करताना कोविड-१९ संबंधी नियमांचे पालन करण्यात यावे. (शासन परिपत्रक पहा)

Previous Post Next Post