महाराष्ट्र राज्य विद्युत विभागात विविध पदांसाठी भरती; दहावी पास, ITI उमेदवारांना सुवर्णसंधी! MSEDCL Recruitment 2024 Apply Online

MSEDCL Recruitment 2024 Apply Online : महाराष्ट्र राज्य विद्युत विभागात विविध पदांसाठी भरती करण्यात येत असून, दहावी पास, ITI झालेल्या उमेदवारांना सुवर्णसंधी आहे, यामध्ये विजतंत्री (Electrician), तारतंत्री (Lineman) व कोपा (COPA) या पदासाठी भरती करण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्य विद्युत विभागात विविध पदांसाठी भरती; दहावी पास, ITI उमेदवारांना सुवर्णसंधी!

MSEDCL Recruitment 2024 Apply Online

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, संवसु अमरावती शहर विभाग, अमरावती अंतर्गत सत्र २०२४-२५ करीता ऑनलाईन पध्दतीने खालील व्यवसायाकरीता शिकाऊ उमेदवारांची प्रशिक्षणाकरीता निवड करावयाची आहे.

विजतंत्री (Electrician)-२५, तारतंत्री (Lineman) -२५ व कोपा (COPA) - ०६ = एकुण - ५६.

शैक्षणिक अर्हता 

  1. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे १०+२ बंधामधील माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
  2. मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधुन विजतंत्री, तारतंत्री व कोपा-पासा व्यवसायात उत्तीर्ण असणे व राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांनी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास परिक्षा मंडळ यांनी प्रमाणीत केलेले दोन वर्षाचा पदविका विजतंत्री/तारतंत्री अभ्यासक्रम प्रमाणपत्र असणे आवश्यक. 

MSEDCL Recruitment 2024 Apply Online

वयोमर्यादा - उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष पुर्ण व कमाल २७ वर्ष असणे आवश्यक,

मागासवर्गीयांसाठी कमाल वयोमर्यादा ५ वर्ष शिथिलक्षम राहील. उमेदवार हा अमरावती जिल्हयाचा रहिवासी असणे आवश्यक असुन, ईतर जिल्हयातील उमेदवारांच्या अर्जाचा विचार केल्या जाणार नाही. (आधारकार्ड वरील पत्यानुसार)

'सिडको' महामंडळामध्ये करिअर करण्याची उत्तम संधी! या पदासाठी मोठी भरती सुरु

तेव्हा ईच्छुक पात्र उमेदवारांनी www.apprenticeshipindia.org या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज जाहीरातीच्या दिनांका पासुन ते दि.३१.०१.२०२४ पर्यंत या कार्यालयाचे आस्थापना क्र. E०११७२७००१८४ या वर योग्य व परिपुर्ण माहीतीसह सादर करावे. विहीत मुदतीनंतर सादर केलेले अर्ज विचारात घेतल्या जाणार नाही.

उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करतांना सर्व सत्रांची, एकत्रीत गुणपत्रिका (ITI), राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा-गुणपत्रक/प्रमाणपत्र (१० वी) व आधार कार्ड सादर (Upload) करावे, अन्यथा केलेल्या अर्जाचा विचार केल्या जाणार नाही. उमेदवाराकडे नित्य वापरात असेल असा (Valid) स्वतःचा ई-मेल आयडी व भ्रमणध्वनी क्रमांक ऑन लाईन अर्जामध्ये नमुद करणे आवश्यक आहे.

उमेदवारांचे शिकाऊ उमेदवार निवडीकरीता आय.टी.आय.चे गुण विचारात घेऊन गुणवत्ता यादीनुसार निवड प्रक्रीया पार पाडण्यात येईल. निवड झालेल्या उमेदवारांना त्या बाबतची माहीती नमुद ई-मेल आयडी व भ्रमणध्वनी क्रमांक कळविण्यात येईल.

महापारेषण मध्ये तब्बल 0444 रिक्त पदांसाठी मोठी भरती सुरु

भारतीय रेल्वेत 'लोको पायलट' पदाच्या 5696 जागांसाठी भरती

$ads={2}

आरोग्य विभागामध्ये 1729 पदांची मेगा भरती, ऑनलाईन अर्ज करा

महत्वाच्या अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा