RTE Admissions 2024 : आरटीई प्रवेशासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळा का दिसत नाही? काय आहे कारण..

RTE Admissions 2024 : राज्यातील आरटीई 25 टक्के प्रवेशासाठी पालकांना ऑनलाईन अर्ज भरण्याकरीताची प्रक्रिया सुरु झाली आहे, मात्र यंदा आरटीई प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरताना शाळा प्राधान्य क्रम निवडताना इंग्रजी माध्यमाच्या शाळा दिसत नाही अशा प्रतिक्रिया येत आहे, यामागे काय आहे मुख्य कारण? सविस्तर पाहूया..

आरटीई 25 टक्के प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास या तारखेपर्यंत मुदत

RTE Admissions 2024

दरवर्षी प्रमाणे यंदा सुधारित अधिसूचना दिनांक ०९/०२/२०२४ नुसार सन २०२४-२५ या वर्षांची आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन राबविण्यात येत आहे.

सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरिता आरटीई अंतर्गत २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियअंतर्गत दिनांक १६/०४/२०२४ ते ३०/०४/२०२४ या कालावधीमध्ये पालकांना प्रवेशाकरीता ऑनलाईन अर्ज भरण्याकरीता प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

आरटीई प्रवेशासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळा का दिसत नाही? काय आहे कारण

आरटीई कायद्यात राज्य शासनाने फेब्रुवारी महिन्यात बदल केला असल्यामुळे, RTE ऑनलाईन अर्ज भरताना इंग्रजी माध्यमाच्या शाळा दिसत नसल्याचे दिसून येत आहे.

एप्रिल महिन्यात शैक्षणिक वर्ष २०२४ २५ साठी  राज्यातील आरटीई प्रवेश प्रक्रिया कशी राबवली जाईल याबाबतची नियमावली प्रसिध्द करण्यात आली होती.

त्यानुसार प्रथम शासकीय, अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये आरटीईच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. तसेच जर विद्यार्थ्याच्या घराजवळ १ ते ३ किलोमीटर अंतरावर शासकीय, अनुदानित किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेची शाळा नसेल तेव्हाच संबंधित विद्यार्थ्याला स्वयंअर्थसहाय्यीत शाळेत आरटीई अंतर्गत प्रवेश दिला जाईल, असे निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे अर्ज भरताना पोर्टलवर इंग्रजी माध्यमाच्या शाळा दिसत नाही.

RTE चे फॉर्म भरण्याकरिता पालकांसाठी महत्वपूर्ण सूचना

आरटीईच्या प्रवेशाचे अर्ज भरण्यासाठी या तारखेपर्यंत पर्यंत मुदतवाढ

आरटीई 25 टक्के प्रवेशासाठी 'या' विद्यार्थ्यांना खासगी (इंग्रजी) शाळेचा पर्याय मिळणार

ज्या विदयार्थ्यांच्या घरापासून १ किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर अनुदानित शाळा, शासकीय शाळा / स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळा नसतील व १ किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर स्वंयअर्थसहाय्यीत शाळा (Self-financed School) असेल तर अशा परिस्थितीत त्या स्वंयअर्थसहाय्यीत (इंग्रजी) शाळेत मुलांना २५ टक्के प्रवेशांतर्गत प्रवेश दिला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

मोठी बातमी! राज्यातील नवीन शैक्षणिक वर्षातील वेळापत्रक जाहीर

आरटीई 25 टक्के प्रवेश बालकाचे वयोमर्यादा येथे पहा

मोठी बातमी! कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू, शासन निर्णय जारी

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा