Aaple Sarkar : राज्यातील नागरिकांसाठी ऑनलाईन पध्दतीने तक्रार दाखल करता यावी तसेच प्रशासनाने ऑनलाईन पध्दतीने अशा तक्रारींचे निवारण करावे यासाठी 'आपले सरकार' ही तक्रार निवारण प्रणाली मंत्रालयीन विभागांबरोबरच राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यामध्ये कार्यान्वित करण्यात आलेली असून, आता याबाबत प्राप्त होणाऱ्या ई-मेल्सचा त्वरित निपटारा करण्याकरिता मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत, सविस्तर वाचा..
$ads={1}
'आपले सरकार पोर्टल' वरील तक्रारी त्वरित निकाली निघणार, सामान्य प्रशासनाने काढले महत्वाचे शासन परिपत्रक
शासनाचे दैनंदिन कामकाज पारदर्शक आणि अधिक लोकाभिमुख होण्यासाठी शासनाने विविध पोर्टल्स विकसित केले आहेत. या पोर्टल्सद्वारे नागरिक निवेदने/गा-हाणी/तक्रारी शासनास सादर करीत असतात, याचाच एक भाग म्हणून नागरिक आणि प्रशासन यांना ऑनलाइन संवाद साधण्यासाठी सेतु निर्माण करणारे 'आपले सरकार २.०' हा शासनाचा महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे.
ऑनलाईन तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया, प्रशासनाकडून तक्रारीचे ऑनलाईन निवारण आणि वरिष्ठांकडून या प्रक्रियेचे संनियंत्रण इ. संदर्भात सदर प्रणालीच्या अंमलबजावणीसंबंधीची आपले सरकार २.० तक्रार निवारण प्रणालीची कार्यपध्दती अद्ययावत करण्यात आली आहे.
मोठी बातमी! कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू, शासन निर्णय जारी
तथापि अद्यापही राज्यातील बहुतेक नागरिक हे मंत्रालयीन विभागामधील अधिकारी विशेषतः प्रशासनिक विभागप्रमुखांच्या शासकीय ई-मेल वर तक्रार/निवेदने सादर करत असल्याचे दिसून येते. त्यामुळे त्याचा निपटारा त्वरित करणे शक्य होत नाही. दिवसेदिवस या ई-मेल्सची संख्या वाढत असून ती कमी करण्यासाठी उपायात्मक योजना करणे आवश्यक आहे. या ई-मेल्सचा त्वरित निपटारा होण्याच्या अनुषंगाने दिनांक १९ एप्रिल, २०२४ रोजीच्या शासन परिपत्रकान्वये संबंधित विभागाने मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. (शासन परिपत्रक)
अस्थायी पदांचा सुधारित आकृतीबंधात समावेश होणार, शासन निर्णय!
मोठी बातमी! शिक्षक पदभरतीबाबत नवीन प्रसिद्धीपत्रक जाहीर
पर्मनंट नोकरीची सुवर्णसंधी! विभागात तब्बल 1377 जागांसाठी भरती सुरु