RTE 1st Std Admission Age Limit 2024 : पहिलीत प्रवेश घेण्याची वयोमर्यादा बदलली; नवीन प्रवेशित बालकांची वयोमर्यादा निश्चित

RTE 1st Std Admission Age Limit 2024 : भारत सरकारच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालयाकडून इयत्ता 1 ली प्रवेशाच्या प्रवेशासाठी बालकाचे वय निश्चित करण्यासंदर्भात एक महत्वाची अधिसूचना जारी करण्यात आली आहे, त्यानुसार नवीन शैक्षणिक वर्ष 2024 - 25 या शैक्षणिक वर्षातील नवीन प्रवेशित इयत्ता 1 लीसाठी (1st Std Admission) किमान मुलांचे वय किती असावे? याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले असून, त्यानुसार आता राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने राज्यातील बालकांच्या नवीन प्रवेशित होणाऱ्या बालकांच्या वयोमर्यादा बाबत सविस्तर सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

$ads={1}

पहिलीत प्रवेश घेण्याची वयोमर्यादा बदलली; केंद्र सरकारचे सर्व राज्यांना निर्देश

RTE 1st Std Admission Age Limit 2024

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (New Education Policy) शिक्षण पद्धतीमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे, केंद्र सरकारने शाळेतील (School Admission Age Criteria) प्रवेश प्रक्रियेसाठी बालकाचे वय निश्चित केले आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) आणि बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार (RTE Act 2009) कायद्यातील तरतुदीनुसार बालकांच्या प्रवेशाचे वय निश्चित करण्यासाठी केंद्राने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना एक महत्त्वपूर्ण सूचना जारी केली आहे.

त्यानुसार आता सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना पुढील शैक्षणिक वर्षातील 2024-25 सत्रापासून ग्रेड 1 म्हणजेच इयत्ता 1 ली मध्ये (1st Std Admission Age) प्रवेशाचे वय 6+ वर्षे पूर्ण असल्याचे सुनिश्चित करण्यात आले आहे.

आता इयत्ता 1 ली मध्ये प्रवेश घेण्यासाठी बालकांचे वय 6 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे. केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या मार्गदर्शनानुसार नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांमध्ये मुलांच्या आयुष्यातील सुरुवातीची पाच वर्षे हे शिकण्यासाठी चा मूलभूत टप्पा आहे. त्यामुळे आता इयत्ता पहिली मध्ये प्रवेश घेण्यासाठी बालकाचे वय सहा वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.

या मानीव दिनांकानुसार ठरणार नवीन प्रवेशित बालकांची वयोमर्यादा

त्यानुसार आता राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने शिक्षण हक्क कायद्यानुसार राज्यातील विशेषतः खाजगी शाळांमध्ये आर्थिक दुर्बल घटकांसाठी RTE अंतर्गत 25 टक्के प्रवेश प्रक्रिया सुरु केली आहे. यासाठी नवीन प्रवेशित होणाऱ्या प्ले ग्रुप/नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी आणि इयत्ता 1 मध्ये प्रवेशित बालकांच्या वयोमर्यादा निश्चित करण्यात आली असून, दिनांक 31 डिसेंबर 2024 हा मानीव दिनांक ठरविण्यात आला आहे.

शिक्ष्निक वर्ष २०२४-२५ या वर्षासाठी आता आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी बालकाचे वय खालीलप्रमाणे असणे आवश्यक असणार आहे.

RTE Admission age Limit 2024

  • प्ले ग्रुप आणि नर्सरी साठी बालकाचे किमान वय दिनांक ३१ डिसेंबर २०२४ रोजी ३ वर्ष असणे आवश्यक आहे. (कमाल वय ४ वर्ष ५ महिने ३० दिवस)
  • ज्युनियर केजी साठी बालकाचे किमान वय दिनांक ३१ डिसेंबर २०२४  रोजी ४ वर्ष असणे आवश्यक आहे. (कमाल वय ५ वर्ष ५ महिने ३० दिवस)
  • सिनियर केजी साठी बालकाचे किमान वय दिनांक ३१ डिसेंबर २०२४ रोजी ५ वर्ष असणे आवश्यक आहे. (कमाल वय ६ वर्ष ५ महिने ३० दिवस)
  • इयत्ता १ ली साठी बालकाचे किमान वय दिनांक ३१ डिसेंबर २०२४ रोजी ६ वर्ष असणे आवश्यक आहे. (कमाल वय ७ वर्ष ५ महिने ३० दिवस) (परिपत्रक)

आरटीई प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन अर्ज - पालकांकरीता महत्वपूर्ण सूचना जारी

Previous Post Next Post