School Holidays 2024 : मोठी बातमी! राज्यातील शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर, नवीन शैक्षणिक वर्षातील शाळा या तारखेपासून पुन्हा सुरु होणार

School Holidays 2024 : राज्यामध्ये काही दिवसांपासून तापमानामध्ये वाढ झाली असून सर्वत्र उष्णतेची लाट पसरली असल्यामुळे राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहणेपासून सवलत देण्यात आली आहे, आता राज्यातील शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली असून, नवीन शैक्षणिक वर्षातील शाळा पुन्हा सुरु करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना राज्याच्या शिक्षण विभागाने जारी केल्या आहेत.

$ads={1}

मोठी बातमी! राज्यातील शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर, नवीन शैक्षणिक वर्षातील शाळा या तारखेपासून पुन्हा सुरु होणार

School Holidays 2024

राज्यातील राज्य मंडळाच्या प्रार्थामक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुट्टीच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी दिनांक 20 एप्रिल 2023 रोजीच्या शासन परिपत्रकान्वये शासनाने सूचना निर्गमित केलेल्या आहेत. 

त्याअनुषंगाने राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन 2024 ची उन्हाळी सुट्टी व नवीन शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये शाळा पुन्हा सुरु करणेबाबत खालीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.

  1. राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना गुरुवार, दि.02 मे, 2024 पासून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
  2. राज्यातील इतर मंडळाच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरु असल्यास अथवा अशा शाळांमध्ये महत्त्वाचे शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असल्यास, विद्यार्थ्यांना सूटी जाहीर करण्याबाबत शाळा प्रशासनाने त्यांच्या स्तरावर उचित निर्णय घेण्याबाबत  आहे.
  3. पुढील शैक्षणिक वर्ष सन 2024-25 मध्ये विदर्भ वगळता इतर सर्व विभागातील राज्य मंडळाच्या शाळा शनिवार दि. 15 जून, 2024 रोजी सुरु करण्यात याव्यात.
  4. जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टी नंतर तेथील राज्य मंडळाच्या शाळा 30 जून रोजी रविवार येत असल्याने सोमवार दि.01 जुलै, 2024 पासून सुरु करण्यात याव्यात. (परिपत्रक)

राज्यातील सर्व विद्यार्थ्यांसंदर्भात शालेय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय!

मोठी बातमी! दहावी-बारावीचा निकाल यंदा मे महिन्यातच येथे पाहता येणार निकाल

$ads={2}

कर्मचाऱ्यांच्या वेतनाकरिता निधी मंजूर, शासन निर्णय जारी

Previous Post Next Post