Election Allowance : गुड न्यूज! राज्यातील या कर्मचाऱ्यांना सुधारित भत्ता मंजूर, शासन निर्णय जारी

Election Allowance Government Decision : भारत निवडणूक आयोगाच्या परिपत्रकानुसार निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्त करावयाच्या कर्मचाऱ्यांना द्यावयाच्या निवडणूक भत्त्याच्या दरामध्ये व काही बाबीमध्ये सुधारणा करण्याबाबत निर्देश दिले आहेत, त्यानुषंगाने सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

$ads={1}

गुड न्यूज! राज्यातील या कर्मचाऱ्यांना सुधारित भत्ता मंजूर, शासन निर्णय जारी

Election Allowance Government Decision

लोकसभा तसेच विधानसभेच्या सार्वत्रिक पोट निवडणुकीच्या वेळी मतदान मतमोजणी कामासाठी नियुक्त केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना द्यावयाच्या निवडणूक भत्ता देण्यात येतो. यापूर्वी निवडणुकांच्या कामासाठी नियुक्त करण्यात येणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना द्यावयाच्या निवडणूक भत्याचे दर शासनाच्या दिनांक १८.०३.२०१४ च्या संदर्भाधिन शासन निर्णयान्वये निश्चित केलेले होते, मात्र आता सुधारित शासन निर्णय दिनांक १८ एप्रिल २०२४ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

अधिकारी, कर्मचाऱ्यांना निवडणूक भत्ता सुधारित दर निश्चित

भारत निवडणूक आयोगाच्या सदर पत्रातील सूचनांना अनुसरुन राज्यातील लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या कर्तव्यार्थ नियुक्त करण्यात येणाऱ्या निवडणूक कर्मचाऱ्यांना द्यावयाच्या निवडणूक भत्याच्या अनुषंगाने सुधारणा करण्यात आली असून, आता त्यानुसार पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे.

Election Allowance

  1. मतदान केंद्र / मतमोजणी केंद्रावर प्रत्यक्ष तैनात करण्यात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनाही वरील तक्यात नमूद केल्याप्रमाणे त्त्याचे दर लागू राहतील.
  2. प्रशिक्षणासाठी उपस्थित राहणाऱ्या, मतदानाचे साहित्य ताब्यात घेणाऱ्या तसेच मतदान व मतमोजणीच्या दिवशी प्रत्यक्ष मतदान / मतमोजणी कर्तव्यार्थ उपस्थित राहणाऱ्या कार्यरत व राखीन अधिकारी / कर्मचारी यांना वरील तक्त्यात नमूद केलेल्या दराप्रमाणे निवडणूक भत्ता अनुज्ञेय राहील. 
  3. हा निवडणूक भत्ता सार्वत्रिक तसेच पोट निवडणुकांसाठी दिला जाईल.
  4. दुर्गम प्रदेशातील difficult terrain) मतदान केंद्रांवर संबंधित मतदान पथकास (Poling official) ३ किंवा त्याच्यापेक्षा जास्त दिवस आगोदर निघावे लागते, त्या मतदान पथकातील अधिकारी व कर्मचारी यांना सामान्य दरा पेक्षा दुप्पट दराने निवणूक भत्ता अनुज्ञेय राहील.
  5. निवडणूक भत्या व्यतिरिक्त, सर्व मतदान केंद्रांवर / मतमोजणी केंद्रांवर निवडणूक संबंधित कामासाठी तैनात मतदान कर्मचाऱ्यांसह पोलिस कर्मचारी, मोबाईल पार्टीमधील कर्मचारी, होमगार्ड, वनरक्षक ग्राम रक्षक दल, NCC कैडेट्स, माजी सैनिक, स्वयंसेवक इत्यादींसाठी पॅक केलेले दुपारचे जेवण आणि/किंवा  हलका अल्पोहार प्रदान केला जाईल.
  6. उपरोक्त पद्धतीनुसार मतदान कर्मचारी पोलीस कर्मचारी आणि निवडणूक कामासाठी नियुक्त केलेले इतर अधिकारी / कर्मचारी बाना TA/DA ची अदागयी करण्यासंदर्भात प्रकरणपरत्वे मूळ विभाग अथवा निवडणूक विभाग यांच्याकडून कार्यवाही करण्यात यावी.
  7. अधिकारी / कर्मचारी यांना प्रवास भत्ता दैनिक भत्ता (TA/DA) देताना तो त्या-त्या वेळी अनुज्ञेय असलेल्या दराने देय होईल, याबाबतचा शासन निर्णय सविस्तर येथे पहा. 

मोठी बातमी! कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू, शासन निर्णय जारी

कर्मचाऱ्यांच्या वेतनाकरिता निधी मंजूर, शासन निर्णय जारी

लोकसभा निवडणुकीच्या मतदान केंद्रांचे नियंत्रण युवा कर्मचारी करणार
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा